Swati Maliwal Kejariwal PA Fight Video: लाइटहाऊस जर्नलिझमला व्हॉट्सॲपसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला व्हिडिओ समोर आला. यामध्ये काही लोक भांडताना दिसत आहेत. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दावा करण्यात येत आहे की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार हे सामाजिक कार्यकर्त्या आणि खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण करताना दिसत आहेत. कॅप्शनमध्ये युजरने लिहिले होते की, हे तर होणारच होतं. स्वाती मालीवाल यांना मारहाण झाली आहे. केजरीवाल यांच्या पीएने ही मारहाण केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयात तुफान हाणामारी होत असल्याची माहिती येतेय. स्वाती, संजय, मारलोना सगळ्यांनाच मुख्यमंत्री व्हायचे आहे पण केजरीवाल यांना आपल्या पत्नीलाच मुख्यमंत्री बनवायचे आहे”

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Sarika Tyagi ने व्हायरल विडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

Video Story Of Ravindra Dhangekar And Devendra Fadnavis.
Ravindra Dhangekar: “निवडणूक हरत असल्याचे लक्षात येताच…” फडणवीसांच्या ‘ॲक्सिडेंटल आमदार’ टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; पाहा व्हिडिओ
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
devendra fadnavis criticize uddhav thackeray for making video of bag checking
“त्यांच्या आधी माझी बॅग तपासली, केवळ भांडवल…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र
Who will understand the pain of parents
“आई वडिलांचे दु:ख कोण समजून घेणार” चिमुकल्याने सांगितले आई बाबांना वेळ देण्याचे दोन फायदे, VIDEO होतोय व्हायरल
Emotional Video of father went viral on social media shows dads hardwork
एका बापाची मजबुरी! कोणत्याच मुलावर ‘हे’ बघायची वेळ येऊ नये; VIDEO पाहून व्हाल निशब्द
jagadguru rambhadracharya ji on kharge sadhu
Video: “भारतात भगवाधारींनीच राजकारण करावं, सूट-बूट घालणाऱ्यांनी…”, जगदगुरू रामभद्राचार्यांचं विधान चर्चेत!
sushma andhare on uddhav thackeray bag checking
उद्धव ठाकरेंची बॅग तपासण्याच्या मुद्द्यावरून सुषमा अंधारे चांगल्याच संतापल्या; म्हणाल्या, “जर तुम्ही…”
Video Viral
“आयुष्यात कितीही मोठे व्हा पण वडिलांचे कष्ट कधी विसरू नका” बाप लेकीचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही इन्व्हिड टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून कीफ्रेम मिळवल्या. रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही आमचा तपास सुरू केला. यातून आम्ही मिरर नाऊच्या फेसबुक व्हिडीओवर पोहोचलो.

रीलच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, हा व्हिडीओ दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाचा आहे आणि त्यात कुटुंबातील सदस्य मध्यस्थी कक्षात एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. कॅप्शनमध्ये असेही नमूद केले आहे की कुटुंबातील सदस्य हे भांडण मिटवण्यासाठी आले होते परंतु सर्वचजण भांडू लागले. त्यानंतर आम्ही गूगल सर्च केले आणि आम्हाला लक्षात आले की हा व्हिडीओ अनेक मीडिया संस्थांनी अपलोड केला होता.

एनसीएमइंडिया काउन्सिल फॉर मेन्स अफेअर्सच्या एक्स हॅण्डलने देखील व्हिडीओ पोस्ट केला आहे.

X वापरकर्ते अंकुर गुप्ता यांनी व्हिडीओची पहिली आवृत्ती अपलोड केली होती.

हे ही वाचा<< कपडे फाडले, रस्त्यात भिडले.. काँग्रेसच्या नेत्यांच्या हाणामारीचं भाजपा कनेक्शन चर्चेत; Video वर लोक म्हणतात, “४०० पार..”

निष्कर्ष: दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाच्या मध्यस्थी केंद्रात कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडण होत होते. जो व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात स्वाती मालीवाल आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या पीए यांच्यातील भांडण होत असल्याचा दावा करण्यात आला होता. हा व्हायरल दावा खोटा आहे.