Arvind Kejariwal Rape Accusations: कथित मद्यविक्री घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)ने केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक केली होती. ‘आप’चे प्रमुख ‘ईडी’च्या कोठडीत असताना अटकेविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान करण्यात आले होते. मात्र, न्यायालयाने तातडीने निकाल देण्यास नकार दिला. तोपर्यंत राऊस जिल्हा न्यायालयाने केजरीवालांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्यामुळे केजरीवालांची रवानगी तिहार तुरुंगात झाली आहे. या प्रकरणात केजरीवालांना हलका दिलासा देत मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्यासाठीची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली असली तरी अद्याप केजरीवाल यांची मुक्तता झालेली नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये सोशल मीडियावर नानाविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलीकडेच लाइटहाऊस जर्नलिझमला एका वृत्तपत्राच्या कात्रणाची पोस्ट व्हायरल झाल्याचे लक्षात आले. यामध्ये तारीख देखील हायलाइट केली गेली होती तर शीर्षकात लिहिले होते की, आयआयटीच्या विद्यार्थिनीवर बलात्काराचा आरोप. कॉपीमध्ये हायलाइट केलेले नाव अरविंद केजरीवाल यांचे होते. नेमकं हे प्रकरण काय सविस्तर पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

X युजर Dr Anita Vladivoski ने व्हायरल न्यूजपेपर क्लिपिंग आपल्या प्रोफाइल वर शेअर केले होते. ही पोस्ट नंतर डिलीट करण्यात आली.

इतर वापरकर्ते देखील समान पोस्ट शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही गूगल कीवर्ड सर्च वापरून आणि The Telegraph मध्ये अशा प्रकारच्या बातम्या आल्या आहेत का हे तपासायला सुरुवात केली. आम्हाला त्यासंबंधीचे कोणतेही वृत्त आढळले नाही. तेव्हा आमच्या लक्षात आले की वर्तमानपत्राची क्लिप खरी दिसत नव्हती. त्यानंतर आम्ही काही ऑनलाइन वृत्तपत्र क्लिपिंग जनरेटर शोधले आणि आम्हाला एक जनरेटर आढळले जे आताचे कात्रण तयार करण्यासाठी वापरलेले गेले असावे असे आम्हाला लक्षात आले.

https://www.fodey.com/generators/newspaper/snippet.asp

या वृत्तपत्र क्लिपिंग जनरेटरवर, एखादी व्यक्ती वृत्तपत्राचे नाव, तारीख, शीर्षक आणि कथा ऍड करण्यासाठी जागा अशा सगळ्या सुविधा या जनरेटर मध्ये दिल्या होत्या. शिवाय केजरीवाल यांनी २०१३ च्या सार्वत्रिक निवडणूकीच्या दरम्यान सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरुद्ध अशा कोणत्याही गुन्हेगारी खटल्याचा तपशील आढळला नाही.

https://www.ceodelhi.gov.in/WriteReadData/Affidavits/U05/SE/40/33-ARVIND%20KEJRIWAL/33-ARVIND%20KEJRIWAL.htm

तपासाच्या दरम्यान, आम्हाला असेही आढळले की हा दावा २०१६ पासून अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर होत आहे.

निष्कर्ष: अरविंद केजरीवाल यांच्यावर महाविद्यालयात बलात्काराचा आरोप असल्याचे सांगणारे वृत्तपत्राचे कात्रण बनावट आहे व ते ऑनलाइन वृत्तपत्र क्लिप जनरेटर वापरून तयार करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejariwal rape accusations of iit students famous newspaper clipping viral why aap chief delhi cm is in arrest during loksabha 2024 svs