Arvind Kejriwal Arrest Angry People Reaction: आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने २१ मार्च रोजी अटक केली होती. आता रद्द केलेल्या अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात केजरीवाल यांना ताब्यात घेण्यात आले. केजरीवालांच्या अटकेचा देशभरातून निषेध करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी लोक निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर सुद्धा उतरले होते. याच पार्श्वभूमीवर लाइटहाऊस जर्नालिझमला एक फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. X वरील या व्हायरल इमेजमध्ये रस्त्यावर प्रचंड गर्दी दिसत आहे, या फोटोमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात चेन्नईच्या रस्त्यावर लोक उतरले आहेत. पण ही प्रचंड गर्दी नेमकी कशासाठी जमली होती, हे पाहूया..
काय होत आहे व्हायरल?
X युजर Poornima Maurya ने हा फोटो शेअर केला होता.
इतर वापरकर्ते देखील हा व्हायरल दावा शेअर करत होते.
तपास:
आम्ही इमेजवर रिव्हर्स इमेज सर्च करून आमचा तपास सुरु केला. आम्हाला सर्च वर, ‘श्री जगन्नाथ मंदिर पुरी’ असे प्रॉम्प्ट सापडले. असाच फोटो आम्हाला विकिपीडियावर आढळून आला.
हा मूळ फोटो नवीन पटनायक यांच्या एक्स हँडलवर आम्हाला आढळून आला.
या पोस्टमधील तिसरा फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेल्या फोटोसारखाच आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्येही हा फोटो वापरलेला आहे.
रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, मंगळवार, २० जून २०२३ रोजी पुरी येथे भगवान जगन्नाथाच्या वार्षिक रथयात्रेदरम्यान भक्तांची गर्दी झाली होती.
हे ही वाचा<< मद्यधुंद शिक्षकाचा शाळेत धिंगाणा; शिवीगाळ ऐकून भडकलेल्या विद्यार्थ्यांनी ‘असा’ काढला राग, पाहा Video
निष्कर्ष: अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात लोक रस्त्यावर उतरले असा दावा करत, २०२३ मधील भगवान जगन्नाथांच्या वार्षिक रथयात्रेदरम्यानचे भक्तांच्या गर्दीचे फोटो व्हायरल होत आहेत.