शेतातील उत्पादनाला न मिळणारा अपेक्षित हमीभाव आणि सततच्या पडणाऱ्या दुष्काळामुळे आजचा तरूण वर्ग नोकरीच्या दिशेने वळल्याचे पहायला मिळते. मात्र, महाराष्ट्रातील एका तरुणाने प्रवाहाबरोबर न जाता शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली येथील २८ वर्षीय सुशिक्षीत तरूणाने यशस्वी शेती केली आहे. विशेष म्हणजे त्याने इंजिनिअरींगचे शिक्षण पुर्ण केले आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरचा चांगल्या पगाराची नोकरी सोडून त्याने शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्या तरूणाचे नाव अनूप पाटील असे आहे. अनुपने अवघ्या दोन एकरमध्ये लाखो रूपयांचे उत्पदन केले आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये अनूपची चर्चा आहे. त्याच्या या धाडसी निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना यशस्वी शेती करण्याची प्रेरणा मिळत आहे.

अनूप पाटील गेल्या दोन वर्षांपासून एका सॉफ्टवेअर कंपनीत इंजीनिअर म्हणून कार्यरत होता. तो देखील इतर सर्वसामान्य तरुणांप्रमाणे काम करत होता. परंतु त्याचे मन नोकरीत रमत नव्हते. ६ वर्ष तो कसेबसे दिवस ढकलत होता. शेवटी त्याने नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. आणि आपला मोर्चा शेतीच्या दिशेने वळवला. अनूपने नोकरी सोडल्यानंतर पहिले तीन महिने गुजरात, महाराष्ट्र व कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या.

त्यानंतर अनूपने शेतीमधील समस्या व संधी यांवर संशोधन केले. अपेक्षित सर्व माहिती गोळा केल्यानंतर अनुप आपल्या गावी परतला. व त्याने योजनाबद्ध पद्धतीने फक्त २ एकर जागेवर मिरची, मका, झेंडूचे फुल आणि उसाची शेती करण्यास सुरवात केली. शेतीसाठी त्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. परिणामी अल्पावधीतच त्याला २० ते २५ लाख रुपयांचा नफा झाला. अनूपच्या मते नोकरी करुन स्वत:ची प्रगती करता येत नाही. त्यासाठी व्यवसायच करावा लागतो.

Story img Loader