Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी अनेक नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतात, तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात. कोणी धक्कादायक स्टंट करताना दिसतात तर कधी कोणी लोकांच्या मनोरंजनासाठी रिल बनवताना दिसतात.
सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. इंडिगो पायलट आणि कंटेट क्रिएटर असलेल्या प्रदीप कृष्णन यांने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो एका प्रवाशाच्या विनंतीवरून हिंदीमध्ये अनाउंसमेंट करताना दिसतो. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की तामिळनाडूचा प्रदीप कृष्णन याने हिंदीमध्ये अनाउंसमेंट केली आहे. तो म्हणतो, “नमस्कार मेरा नाम प्रदीप कृष्णन है. मेरा फर्स्ट ऑफीसर का नाम बाला है हमारे लीड का नाम प्रियंका आहे. हम आज चेन्नईसे मुंबई जाऐंगे ३५००० में उडाऐंगे पूरा अंतर १५०० किमी है. पूरा टाईम एक घंटा ३० मिनिट का है. हम सीट बेल्ट डालेंगे और मै भी सीट बेल्ट डालूंगा. (नमस्कार माझं नाव प्रदीप कृष्णन आहे. माझ्या फर्स्ट ऑफीसरचे नाव बाला आहे. आमच्या प्रमुखाचे नाव प्रियंका आहे. आज आम्ही चेन्नईहून मुंबईला जात आहोत. ३५००० मध्ये उडवणार. संपूर्ण अंतर एक तास ३० मिनिटे होणार. आपण सीट बेल्ट लावू या मी पण सीट बेल्ट लावतो”
एका प्रवाशाच्या विनंतीवरून प्रदीप कृष्णन यांनी हिंदीमध्ये अनाउंसमेंट केली आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
capt_pradeepkrishnan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पायलट कॅप्टन प्रदीप क्रिष्णन याने हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “एका अतिशय गोड प्रवाशाने मला हिंदीत अनाउंसमेंट करायला सांगितली. मी खूप मनापासून प्रयत्न केला.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “किती गोड अनाउंसमेंट केली” तर एका युजरने लिहिलेय, “चांगला प्रयत्न केला भाऊ. असाच चालू ठेवा. शुद्ध हिंदी तुम्ही शिकणार. त्याची काळजी नाही. किमान आपण प्रयत्न केला पाहिजे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “साहेबांचे कौतुक आहे. विनंतीवरून पायलटनी हिंदीत घोषणा करण्याचा प्रयत्न केला.” अनेक युजर्सनी या पायलटवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.