जगभरात सापांच्या अनेक वेगवेगळ्या प्रजाती आढळतात, त्यापैकी काही बिनविषारी तर काही विषारी असतात. सापाची अनेकांना खूप भीती वाटते, कारण ते कधी कोणाला दंश करतील याचा काही नेम नाही. सध्या सोशल मीडियावर सापांसंबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये साप कधी कार, दुचाकीमध्ये अडकलेले तर कधी घरात फ्रिजच्या मागून बाहेर निघाल्याचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत. पण सध्या एका सापाचा असा एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे तो पाहून या घरमालकाने घराच्या सुरक्षेसाठीच सापाला दरवाजात ठेवलं आहे की काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
हेही पाहा- वळू घराच्या छतावर गेला पण खाली यायचा रस्ता सापडेना, संतापून थेट रस्त्यावर उडी मारली अन्…
व्हिडिओमध्ये एक साप दरवाजातून बाहेर येताना दिसत आहे. शिवाय हा साप रागाने व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीवर फुत्कारताना दिसत आहे. सापाच्या भीतीने अनेक लोकांना घाम फुटतो, अशात तुम्हाला काहीच कल्पना नसताना जर एखादा साप अचानकपणे तुमच्या घराच्या दरवाजातून बाहेर आला तर त्यावेळी वाटणाऱ्या भीतीची कल्पना करणंही शक्य नाही. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक भयंकर साप दरवाजामधून अचानक बाहेर येत फणा काढून समोरच्या व्यक्तीवर फुत्कारताना दिसतं आहे.
हेही पाहा- Video: बापरे! चक्क नागासमोर ‘माकड’चाळे, शेपटी ओढल्यानंतर नागाने काढला फणा अन्…; पाहा Viral व्हिडीओ
या व्हिडिओत एक साप लाकडी दरवाजाच्या शेजारी असलेल्या रिकाम्या जागेतून बाहेर येऊन फणा काढताना दिसत आहे. शिवाय या व्हिडीओमध्ये एक महिला घराच्या आतमध्ये उभी असल्याचं दिसतं आहे. ती सापाच्या भीतीने दूर उभी राहिल्याचं दिसतं आहे. शिवाय एवढ्या भयंकर सापाचा व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीच्या धाडसाचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. मात्र, व्हिडीओ बनवणाऱ्यावर साप मात्र चांगलाच रागवल्याचं दिसतं आहे.
हा व्हिडिओ @TheFigen नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप थरारक वाटत आहे. त्यामुळे तो मोठ्या प्रमाणात लाइक आणि शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सर्वात सेफ सुरक्षा व्यवस्था!’ या थरारक व्हिडिओला आतापर्यंत २४ हजाराहून जास्त वेळा पाहिला गेला आहे.
तर हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. तर अनेकांनी या व्हिडीओला मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘असा सुरक्षारक्षक असला तर घरात घुसण्याची कोणी हिम्मत करु शकणार नाही’, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे तर आणखी एका वापरकर्त्याने ही अभेद्य सुरक्षा व्यवस्था असल्याचं म्हटलं आहे.