सध्या सोशल मीडियावर अनेकदा प्राण्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक सिंहाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अंगावर शहारा येणारा हा व्हिडीओ आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस आणि सिंहाची सुंदर मैत्री दिसते. पण हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला वेगळं चित्र बघायला मिळेलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडीओमध्ये दिसणारा हा माणूस व्हॅल ग्रुनर हा माणूस प्रत्यक्षात बोत्सवाना (दक्षिण आफ्रिका) च्या कालाहारी वाळवंटातील एका राखीव जागेत सिर्गा नावाच्या सिंहाचा केअर टेकर आहे. ९ वर्षांच्या सिंहाला वॅलने मोठ केलं ​​आणि त्यांच्यात खूप प्रेमळ नाते आहे. तो अनेकदा त्याच्या आणि सिर्गाच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या फोटो इंस्टाग्रामवर शेअर करतो. त्याचे सिर्गासाठी ‘सिर्गाथेलिओनेस’ नावाचे स्वतंत्र खाते आहे ज्याचे ७८ हजार फॉलोअर्स आहेत.

(हे ही वाचा: जीन्सवरचा छोटा खिसा कॉइन ठेवण्यासाठी बनवला नव्हता, तुम्हाला बरोबर उत्तर माहित आहे का?)

( हे ही वाचा: वा!! हरणाने मारलेला गोल आणि त्यानंतर केलेलं सेलिब्रेशन पाहून तुम्हीही व्हाल फॅन; पाहा viral video)

त्याने काही आठवड्यांपूर्वी खालील व्हिडीओ अपलोड केला होता ज्याला कॅप्शन दिली होती “कलाहारी कॅटवॉक” (Kalahari catwalk). त्या पोस्टला सुमारे २,७०० लाइक्स मिळाले आहेत. व्हिडीओ कलहारी रिझर्व्हमध्ये सिर्गाच्या आयुष्यातील काही क्षण दाखवते. व्हिडीओ सुरू होताच, व्हॅल सिंहाच्या घेराचे गेट उघडताना दिसत आहे. मग, सिरगा त्याला अभिवादन करण्यासाठी उडी मारतो आणि त्याला मिठी मारतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As soon as the gate of the cage was opened the lion jumped on the caretaker and jumped watch viral video ttg