सोशल मीडियाच्या जमान्यात कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल सांगता येत नाही. सोशल मीडियावर आपण दररोज हजारो व्हिडीओ पाहत असतो. त्यापैकी काही व्हिडीओ आपल्याला थक्क करतात, तर काही पोट धरुन हसायला लावतात. शिवाय काही जुगाडू लोकांच्या क्रिएटिव्हिटीचे व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी आश्चर्यचकित होतात. सध्या अशाच एका जुगाडू व्यक्तीच्या व्हिडीओने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.
हो कारण या व्यक्तीने कारमध्ये चार्जिंग स्टँड नसल्यामुळे त्याने आपला मोबाईल अशा ठिकाणी ठेवला आहे, जे पाहून अनेकजण थक्क झाले आहेत, तर अनेकांना आपलं हसू आवरण कठीण झालं आहे. खरं तर अनेक लोक आपापल्या सोयीनुसार आणि वेळेनुसार अनोखे शोध लावतात. त्यालाच नेटकरी जुगाड असं म्हणतात. देशासह जगभरात जुगाडू लोकांचे लाखो व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एका जुगाडू व्यक्तीने असं काही केलं आहे, जे पाहून अनेकांनी त्याच्या जुगाडाचं मनापासून कौतुक केलं आहे. व्हिडिओमध्ये, मोबाईल चार्जिंगसाठी स्टँड नसल्यामुळे त्याने चक्क चप्पलेचा वापर करुन अनोखा जुगाड केल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही पाहा- Video : “चांगली शाळा बांधून द्या ना…”, पडझड झालेली शाळा दाखवत चिमुकलीची थेट मोदींना विनंती
चार्जिंग स्टँडसाठी डुगाड –
खरं तर, आजच्या काळात अनेक प्रकारची उपकरणं तयार झाली आहेत, शिवाय या उपकरणांमुळे माणसाचे काम खूप सोपे झाले आहे. तर या उपकरणांची लोकांना खूप सवय झाली आहे. असंच एक उपकरण मोठ्या प्रमाणात वापरलं जातं, ते म्हणजे कारमध्ये मोबाईल चार्ज करण्याचं चार्जिंग स्टॅंड. सध्या सर्रास प्रत्येक कारमध्ये मोबाईल ठेवण्यासाठीही स्टँडचा वापर केला जातो. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडोओमध्ये कारचालकाला मोबाईल चार्जिंगसाठी स्टँड मिळत नसल्याने त्याने चक्क आपली चप्पल गाडीच्या डॅश बोर्डला जोडत, चप्पलेचाच स्टँड म्हणून वापर केल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही पाहा- Video: सेल्फीच्या नादात मासा समजून पाण्यात टाकला महागडा iPhone; व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल हसू
या कार चालकाच्या जुगाडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. तर ielts.mehkma नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे. नेहमीप्रमाणे व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये, चप्पलेचा अनोखा वापर केल्याचं लिहिले आहे. तर काहींनी चालकाच्या कल्पतेला आमचा सलाम असल्याचंही कमेंटमध्ये लिहिलं आहे. शिवाय या ड्रायव्हरच्या जुगाडाला तोड नसल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे.