Voting Misconduct Viral Video Fact: लाइटहाऊस जर्नलिझमला एक व्हिडीओ व्हॉट्सॲपसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. व्हिडीओमध्ये मतदान केंद्राच्या आत मतपत्रिकेत अफरातफर करण्यात आली असा दावा करण्यात आला येत आहे, ही घटना हैदराबादमधील बहादूरपुरा येथील असदुद्दीन ओवेसी यांच्या मतदारसंघात घडली आहे, असा दावा सुद्धा तुम्हाला कॅप्शनमध्ये दिसून येईल. तपासाच्या दरम्यान आम्हला या व्हिडीओची खरी बाजू लक्षात आली, नेमकं हे प्रकरण काय चला पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

X युजर @HinduRajeshmani ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
MIM In Delhi Election 2025.
Delhi Election : दिल्लीतील २०२० च्या दंगलीतील आरोपी लढवणार विधानसभा, ओवैसींच्या पक्षाने दिली उमेदवारी
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
mahayuti government,
लेख : नव्या विधानसभेकडून दहा ठोस अपेक्षा
Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे

इतर वापरकर्ते देखील व्हायरल व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून आणि त्यातून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला. रिव्हर्स इमेज सर्चद्वारे आम्हाला आढळले की हा व्हिडीओ २०२२ मध्ये इंटरनेटवर शेअर करण्यात आला होता.

दुसऱ्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्चद्वारे आम्हाला आढळले की हा व्हिडीओ भाजप पश्चिम बंगालच्या अधिकृत X हँडलने देखील पोस्ट केला आहे.

२७ फेब्रुवारी २०२२ रोजी अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये टीएमसी समर्थकांचा उल्लेख करण्यात आला आहे. रिव्हर्स इमेज सर्चद्वारे आम्हाला सीपीआयएम पश्चिम बंगालच्या फेसबुक पेजवर अपलोड केलेला व्हिडीओ देखील सापडला. हे एक फॅन पेज होते.

कॅप्शनमध्ये म्हटले आहे (अनुवाद): बंगालच्या शांततापूर्ण नगरपालिकेचा व्हिडीओ शेअर करा आणि पसरवा….

यावरून हा व्हिडीओ पश्चिम बंगालमधील महापालिका निवडणुकीतील असल्याचे आमच्या लक्षात आले. दुसऱ्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च चालवून आम्हाला editorji.com वर अपलोड केलेला व्हिडीओ सापडला.

https://www.editorji.com/bengali/local/false-vote-at-lakeview-school-south-dumdum-1645950497882

रिपोर्ट मध्ये म्हटले (अनुवाद): दक्षिण डमडममधील लेकव्ह्यू स्कूलमध्ये बनावट मतदानाचा आरोप, व्हिडीओ पहा त्यानंतर आम्ही यूट्यूबवर यासंबंधीचा कीवर्ड शोधला आणि दोन वर्षांपूर्वी TV9 बांग्ला द्वारे अपलोड केलेला व्हिडीओ सापडला.

कॅप्शनमध्ये म्हटले आहे (अनुवाद): लेकव्ह्यू स्कूलमध्ये दक्षिण दम दम नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३३ साठी मतदान सुरू आहे. एजंटनेच मतदारांना थांबवून ईव्हीएमचे बटण दाबले. तो व्हिडीओ पहा.

आम्हाला मुख्य निवडणूक अधिकारी तेलंगणाच्या X हँडलवर एक पोस्ट देखील आढळली

कॅप्शनमध्ये म्हटले आहे: तेलंगणातील संसदेच्या निवडणुकीदरम्यान कथितपणे अफरातफरी होत असल्याचे दाखवणारा एक जुना व्हिडीओ व्हॉट्सॲपवर शेअर केला जात आहे. व्हिडीओ तेलंगणातील नाही.

हे ही वाचा<< घाटकोपरमध्ये भाजपाच्या ‘या’ नेत्याच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटे? Video मुळे गोंधळ, पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?

निष्कर्ष: २०२२ मधला पश्चिम बंगालचा जुना व्हिडीओ ज्यात नगरपालिका निवडणुकांमध्ये झालेल्या गैरप्रकाराविषयी माहिती दाखवण्यात आली आहे, तो तेलंगणातील असल्याचे सांगून मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. व्हायरल दावे खोटे आहेत.

Story img Loader