Asaduddin Owaisi Supporting Modi Viral Video: असदुद्दीन ओवेसी मीडियाशी बोलत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचे लाइटहाऊस जर्नलिझमला लक्षात आले आहे. १२ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी मीडियाशी बोलताना ‘नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, अशी आम्हाला आशा आहे’ असे म्हणताना दिसले. तपासादरम्यान आम्हाला या व्हिडीओची वेगळीच बाजू दिसून आली आहे. उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी सुद्धा ओवेसी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये ओवेसी एका सार्वजनिक सभेत शिव तांडव स्तोत्र गाताना दिसले असा दावा करण्यात आला होता तपासाच्याशेवटी हा व्हिडीओ एडिट केलेला असल्याचे लक्षात आले होते. लोकसभेच्या मतदानाच्या वेळी सुद्धा ओवेसी यांच्या मतदारसंघात मतदारांना धक्काबुक्की करून केंद्रातील अधिकाऱ्यांनीच बटण दाबले असे सांगणारा व्हिडीओ सुद्धा समोर आला होता, हा व्हिडीओ सुद्धा खोटा असल्याचे नंतर स्पष्ट झाले होते. ओवेसी यांचा आताचा व्हिडीओ सुद्धा अनेकांच्या भुवया उंचावत असताना त्याची सत्यता पडताळून पाहूया..
काय होत आहे व्हायरल?
X यूजर Sachin Yadav Journalist ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.
इतर सोशल मीडिया वापरकर्तेही हाच व्हिडीओ शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही व्हिडीओवरून कीफ्रेम मिळवून आमचा तपास सुरू केला. त्यानंतर आम्ही कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च चालवले. आम्हाला असदुद्दीन ओवेसी यांच्या मुलाखतीचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळाले. टाईम्स नाऊने अपलोड केलेल्या यूट्यूब शॉर्टनुसार, एआयएमआयएम अध्यक्ष म्हणाले, ‘आशा आहे की पीएम मोदींना तिसरी टर्म मिळणार नाही’.
नऊ दिवसांपूर्वी इंडिया टुडेनेही व्हिडीओ अपलोड केला होता.
इतर अनेक वृत्तवाहिन्यांनीही हा व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यामध्ये ते स्पष्टपणे ‘नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार नाहीत’, असे म्हणताना दिसत होते.
X (पूर्वीचे ट्विटर) वरही व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता.
हा व्हिडीओ ANI हिंदीने त्यांच्या अधिकृत X हँडलवर पोस्ट केल्याचेही आढळून आले.
इथेही असदुद्दीन ओवेसी ‘नरेंद्र मोदींना तिसरी टर्म पंतप्रधानपदी मिळू नये अशी आशा आहे’ असे म्हणताना दिसले.
“महाराष्ट्रात भाजपाच्या नावे १८ हुन अधिक विजय, तर ठाकरे, शरद पवार गटाला.. “, ज्योतिषांची निकालासाठी मोठी भविष्यवाणी
निष्कर्ष: एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून तिसरी टर्म मिळण्याची आशा आहे असे म्हटले नाही. व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे.