सगळ्यात सुखकारक असा विमानाचा प्रवास मात्र आसाराम बापू आणि त्याच्या समर्थकामुळे प्रवाशांना मात्र तो चांगलाच महागात पडला. अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि इतर आरोपांवरून अटकेत असलेला आसाराम बापूच्या आरोग्य तपासणीसाठी त्याला विमानातून दिल्लीत नेले जात होते. तेव्हा विमानाच्या ७० जागेपैकी ३५ जागांवर आसारामचे समर्थक होते. पण नंतर या समर्थकांनी विमानात जो दंगा केला त्यामुळे मात्र पोलीस इतर प्रवासी आणि वैमानिक देखील त्रस्त झाले.
जोधपूरवरून दिल्लीकडे रवाना झालेल्या विमानात असलेल्या या प्रवाशांनी संपूर्ण प्रवासात ‘आसाराम बापू की जय. साई साई’ असा जयघोष करत इतर प्रवाशांची झोप उडवून टाकली. जेव्हा विमान टेक ऑफ करत होते. तेव्हा त्यावेळी काही समर्थक उभे राहिले. त्यांना सुरक्षेसाठी सिटबेल्ट लावण्याचे सांगण्यात आले मात्र आपल्यासोबत आसाराम सारखा देव सोबत असताना सिट बेल्टची काय गरज आहे असे उद्धट उत्तर त्यांनी दिले. तसेच विमानाचे संतुलन बिघडत असल्याने शेवटी त्रस्त झालेल्या वैमानिकांनी त्यांना बसण्याची चेतावणी दिली. काही प्रवशांच्या मते पोलिसांना त्रास देण्यासाठी आसाराम समर्थकांनी हा दंगा माजवला होता. आता हे भक्त खरच पोलिसांवर वचपा काढण्यासाठी हे करत होते कि काय कोण जाणे पण हा प्रवास मात्र इतर प्रवशांना चांगलाच महागात पडला हे मात्र नक्की.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा