Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशी म्हटले की आपल्याला सगळ्यांना आठवते ती म्हणजे आळंदी ते पंढरपूरची वारी. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा असतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपुरला पायी चालत येतात. अशात ते पंढरपूरी जात असताना अभंग गातात, फुगड्या खेळतात आणि त्यासोबतच डान्स करताना दिसतात. या वारीत येणाऱ्या लोकांची वयाची काही सीमा नसते. अनेक तरुणही या वारीत सहभागी होतात तर दुसरीकडे म्हातारो आजी-आजोबा आपल्याला या वारीत दिसतात. अशाच एक आज्जीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या आज्जीबाई अगदी आपल्या हक्काच्या माणसापुढे रडून आपली व्यथा मांडतो तशी व्यथा विठ्ठला कडे मांडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही निशब्द व्हाल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक आज्जी विठ्ठलासमोर धायमोकलून रडत आहे. यामध्ये ही माऊली विठ्ठलासमोर रडत रडत स्वत: चं दुख: विठ्ठलाला सांगत आहे. ‘माय मेली बाप मेला। आता सांभाळी विठ्ठला।। मी तुझे गा लेकरू। नको मजशी अव्हेरू।।’ अशी हृदयस्पर्शी याचना ती करते. मायबाप नसल्यामुळे आपला कैवार विठ्ठलानेच घ्यावा अशी आर्त हाक ती देते. ‘तुजवाचूनी विठ्ठला। कोणी नाही रे मजला।।’ असा पोरकेपणाचा भाव विलक्षण व्याकुळतेने प्रकट करते. अवघ्या जगाचा पिता असलेल्या विठ्ठलाचे कृपाछत्र लाभले तर आपले पोरकेपण संपायला वेळ लागणार नाही, ही तिची श्रद्धा आहे. म्हणून विठ्ठलाकडे ती पुन्हा-पुन्हा विनवणी करते.

Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
cm Devendra fadnavis loksatta
महाकालीचे दर्शन शुभसंकेत, ठरवल्यापेक्षा मोठे काम होणार – फडणवीस
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
Ravindra Chavan responsibility BJP state president post
भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांना प्रतीक्षा
Bengaluru Crime News
मुलांना विष पाजलं, स्वत:ही केली आत्महत्या; बंगळुरूत दाम्पत्याचं धक्कादायक कृत्य; मरणापूर्वी लिहिला सविस्तर ईमेल!
Ramdas Athawale confirms Rahul Gandhi allegations regarding Somnath Suryavanshi Nagpur news
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच; राहुल गांधी यांच्या आरोपाला आठवलेंकडून दुजोरा

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – टोलनाक्याला कारची जोरदार धडक, भीषण अपघातात कारचा चेंदामेंदा; Video पाहून उडेल थरकाप

या आजींचा हा जुना व्हिडीओ पुन्हा एकदा वारी सुरु होताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.  हा व्हिडीओ पाहून तुम्हीही निशब्द व्हाल.

Story img Loader