पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात, आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो.माऊलींचा, विठुरायाचा नामघोष करत वारकरी पंढरपूरच्या दिशेनं निघाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी वारीत सहभागी झाला आहे .घर, संसार, शेती, पाऊस सगळंच विठुरायाच्या विश्वासावर ठेवून वारकरी वारीत सहभागी होतो. याच वारीतील एका ८४ वर्षीय आज्जीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल वय हा फक्त एक आकडा असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वय हा फक्त एक आकडा असतो. मन तरूण असेल तर म्हातारपणातही एवढा उत्साह निर्माण होतो. विठ्ठलाच्या भेटीची आस घेऊन दुपारच्या भर उन्हात पायाने धावा करत वारीचा टप्पा पार करणाऱ्या आज्जीबाईंचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर असणाऱ्या या आज्जी भर उन्हात ४३ सेल्सियस तापमानात अखंड चालत आहेत. या आज्जीबाईंचं वय ८४ वर्ष इतकं आहे. मात्र तरीही त्या जराही थकलेल्या दिसत नाहीयेत. ‘पंढरीची वारी करी वारकरी उन्ह पावसाची चिंता कोण करी’ असे म्हणत या आज्जी चालत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – वारकरी म्हणे- डॉग म्हणजे डॉक्टर, हा भोळेपणा पाहून डॉक्टरांना आलं हसू; पाहा वारीतील मजेशीर व्हिडीओ

वारीमध्ये लोक पंढरपूर पर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्ती गीते, नृत्य आणि टाळ नाद यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची दिंडी हजारो दिंड्यांसह पंढरपूरला येतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व दिंड्या वाखरी गावातील संतनगरी या ठिकाणी एकत्र येतात.