Anand Mahindra on Ashadhi Wari 2024: पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणार एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त पांडुरंग पांडुरंग. आषाढी एकादशी म्हटले की आपल्याला सगळ्यांना आठवते ती म्हणजे आळंदी ते पंढरपूरची वारी. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा असतो. या सोहळ्यात सहभागी झालेले वारकरी कित्येक किलोमिटरचा टप्पा पार करत पांडुरंगाला पाहण्यासाठी जातात. या वारीत सहभागी झाल्यावर प्रत्येकजण एकच सांगतो ते म्हणजे, “प्रत्येकानं एकदा तरी वारी नक्की अनुभवावी” दरम्यान आता उद्योगपती आनंद महिंद्राही विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत ते नेहमीच लक्ष वेधून घेतात. त्यांच्या अशाच एका पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने वारी संदर्भात द्वीट केलं आहे. “विठ्ठलाच्या आषाढ वारीला सुरुवात होत आहे. आषाढी वारीमध्ये तल्लीन होणारा वारकरी, भक्तिमय वातावरणात तल्लीन झालेले भाविक, वारीतील चैतन्य आणि त्यागाचे काही क्षण आम्ही आपल्यापुढे मांडत आहोत. वारीला आषाढी एकादशी वारी म्हणूनही ओळखले जाते. दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने हजारो भावी पायी दिंड्या आणि पालखीच्या माध्यमातून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पोहोचतात. वारीमध्ये वारकरी हरिनामाच्या गजरात टाळ चिपळ्या वाजवत, नाचत, अभंग गात, रिंगण सोहळा करीत भक्तीभावाने आणि सामुदायिक जबाबदारीने येत असतात. या भक्तीरसाने चिंब झालेल्या या अध्यात्मिक उत्सवातील आनंद सोहळा अनुभवण्यासाठी आमच्या सोबत राहा.” महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केलेल्या या द्वीटला आनंद महिंद्रा यांनी रिपोस्ट करत म्हटलं, “‘टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीची वीणा…

“अरे वा ! एकदम मराठीतलं काव्य. मस्त वाटलं माऊली”

आनंद महिंद्रा यांच्या या पोस्टखाली नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत कौतुक करत आहेत. एका युजरने “अरे वा ! एकदम मराठीतलं काव्य. मस्त वाटलं माऊली” अशी प्रतिक्रिया दिली आहे. माझा पंढरी, जय विठ्ठल जय विठ्ठल, परमानंद, लय, शिस्त,भक्ती, निष्ठा! ! ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

पाहा पोस्ट

हेही वाचा >> Photo: “कृपया आपला ‘मी’ पणा…” असा अपमान फक्त पुण्यातच! ही पुणेरी पाटी वाचून पोट धरुन हसाल

ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भंडार्‍याची उधळण करीत ‘सदानंदाचा येळकोट…येळकोट येळकोट जय मल्हार’ असा जयघोष करीत जेजुरी नगरीतून पुढच्या दिशेने निघाली आहे. ६ जुलै रोजी माऊलींची पालखी सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल. यावेळी दुसऱ्या टप्प्यातील शाही स्नान नीरा नदीच्या काठी माऊलींना घातलं जाईल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashadhi wari 2024 businessman anand mahindra tweet on wari with special post in marathi video viral srk