Ashadhi Wari 2024: आषाढी एकादशी म्हटले की आपल्याला सगळ्यांना आठवते ती म्हणजे आळंदी ते पंढरपूरची वारी. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा असतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपुरला पायी चालत येतात. अशात ते पंढरपूरी जात असताना अभंग गातात, फुगड्या खेळतात आणि त्यासोबतच डान्स करताना दिसतात. या वारीत येणाऱ्या लोकांची वयाची काही सीमा नसते. अनेक तरुणही या वारीत सहभागी होतात तर दुसरीकडे म्हातारो आजी-आजोबा आपल्याला या वारीत दिसतात. अशाच एका तरुण आजोबांचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

आषढी एकादशीसाठी पाऊले पंढरपूरकडे निघाली आहेत. येत्या १७ जुलै रोजी पंढरपुरात आषाढी यात्रेचा सोहळा पार पडणार आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांना विठ्ठलाची आस लागलेली असते. विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी वारी करणारे लाखो भाविक तो क्षण अनुभवण्यासाठी वारी करतात. वारकऱ्यांचा हा उत्साह बघण्यासारखा आणि अनुभवण्यासारखा असतो. पंढरपूरची वारी हा वैष्णवांचा मेळा असून त्यात भेद-भाव नसतो ना कोणता रंग, ना धर्म असतो. अतिशय निर्मळ भक्तीभावात ही वारी पार पडते. दरम्यान याच वारीतल्या एका आजोबांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ८२ वर्षाच्या या आजोबांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा आहे.

आजोबांच्या इच्छाशक्तीला सलाम

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आजोबा टाळ, मृदुंगाच्या तालावर नाच करत आहेत. इतर वारकऱ्यांसोबत फुगड्या घालत आहेत. तसेच वारीतले वेगवेगळे खेळही आजोबा खेळत आहेत. यावेळी त्यांची ऊर्जा आणि उत्साह पाहून एखादा तरुणच आहे असं वाटल्याशिवाय राहत नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “विजय नेहमी शांततेत मिळवायचा” बैलगाडा शर्यतीचा थरार; ओव्हरटेक करीत क्षणात कशी जिंकली शर्यत, एकदा पाहाच

पंढरीच्या या वारीत ४ वर्षापासून तर ८० वर्षांपर्यंतचे विठ्ठल भक्त वय विसरुन या तल्लीन झाल्याचं पहायला मिळतं. विठुरायाचा गरज सगळ्यांच्या मुखी सुरु असतो. हा वारकरी जीवाची तमा न बाळगता ऊन, वारा पाऊस विठ्ठलाच्या भक्तीने मार्गस्थ होत असतो. रोज अनेक किलोमीटरचा प्रवास पार करुन विसावा घेतो आणि पुन्हा नवा टप्पा गाठायला तयार होतो. खांद्यावर पताका, गळ्यात टाळ, विणा, मृदंग, मुखी हरीनामाचा जयघोष आणि डोक्यावर तुळशी घेऊन अनेक दिंड्या निघाल्या आहेत. विठू नामाच्या गजरानं वारीचा मार्ग दुमदुमून गेलाय. या सोहळ्यात वारकऱ्यांचा उत्साह वेगळाच असतो. दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या वयाच्या ऐशींतही पायी वारी करणाऱ्या आजोबांमध्येही हाच उत्साह दिसतोय.या व्हिडीओमध्ये आजोबांचा उत्साह आणि आनंद पाहून तुम्हीही थक्क व्हाल.