Ashadhi Wari: घरून निघून एखाद्या ठिकाणावरून निघणाऱ्या दिंडीबरोबर पंढरपूरला जाणे म्हणजे वारी. तसेच या दिंडीबरोबर जाऊन, भक्ती भावात विलीन होऊन पंढरपूरला जाण्यात या वारकऱ्यांना स्वर्गसुखच असते. १८ ते २० दिवस सर्व सांसारिक वैभव, सुख सोडून फक्त ईश्वराच्या धानात राहणारे वारकरी लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रात आहेत, तर अनेक दिवसांनी कुटुंबातील सदस्यांपासून दूर राहिलेले वारकरी जेव्हा घरी पुन्हा येतात, तेव्हा घरच्यांचाही आनंद द्विगुणित होतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यामध्ये जेव्हा वारीवरून आई घरी येते तेव्हा लेक मोठ्या मनाने तिचे स्वागत करतो.
एक अज्ञात माणूस दुचाकी घेऊन येतो. दुचाकीवर मागे आई बसलेली असते. जेव्हा घराजवळ दुचाकी थांबते तेव्हा फुलांनी सजवलेलं दार पाहून तिच्याही चेहऱ्यावर हसू उमटते. आई दुचाकीवरून उतरते, कठड्यावर तिचं सामान ठेवते, डोक्यावर साडीचा पदर घेऊन घराच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात करते. तेव्हा आईचा मुलगा व सून दारात येतात आणि महिलेच्या पाया पडतात. आषाढी वारी करून आई घरी आली तेव्हा घरच्यांनी कसं स्वागत केलं व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.
व्हिडीओ नक्की बघा…
माऊलीचं मुलानं केलं स्वागत:
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, दुचाकीवरून आई घरी परतते, तेव्हा तिच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करून ठेवलेली असते. घरात एक परात ठेवलेली असते. परातीभोवती फुलांच्या पाकळ्या असतात. लेक, सून व महिलेचा नवरा आईला परातीत उभं रहायला सांगतात, तिच्या पायांवर फुलांच्या पाकळ्या ठेवतात. सून आरतीचे ताट घेऊन ओवाळते व आईचा घरात प्रवेश होतो. यादरम्यान सर्व तिच्यावर फुलांचा वर्षाव करतात. आई देवघरात जाऊन विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीच्या पाया पडते व येथेच व्हिडीओचा शेवट होतो.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @lay_bhari_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओला ‘माऊलीची वारी खऱ्या अर्थाने सफल संपन्न झाली…!’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. आई आषाढीवारी एवढे दिवस पायी करून घरी परतली म्हणून तिच्या मुलाने असं खास स्वागत केलं आहे, जे पाहून काही क्षणासाठी तुमचेही डोळे पाणावतील. आईचे केलेले खास स्वागत पाहून नेटकरीसुद्धा व्हिडीओचे विविध शब्दांत कौतुक करताना दिसत आहेत