ई-कॉमर्सच्या व्यवहारातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या अलीबाबा या कंपनीचे सीईओ जॅक मा हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ४९९० कोटी रुपयांचा मालक असलेला हा व्यक्ती इतके पैसे कुठे खर्च करतो असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण गमतीची गोष्ट म्हणजे मा यांच्याकडे मिळालेला पैसा खर्च करण्यासाठी वेळच नाही, असे त्यांनीच ‘ब्लूमबर्ग’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. तुम्ही मिळवलेला पैसा अशाप्रकारे खर्च करा, तसे केल्यास जास्त चांगले असे लोक सांगतात. मी सरकारपेक्षा आणि इतरांपेक्षा चांगल्या पद्धतीने माझा पैसा खर्च करु शकतो असा सल्ला ते देतात. अनेकदा लोक मला पैसे खर्च करण्यासाठी काही सल्ले देतात. मात्र माझ्याकडे त्या कामासाठी अजिबात वेळ नाही. मार्च २०१७ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात अलीबाबाचे उत्पन्न ५६ टक्क्यांनी वाढून २३ बिलियन अमेरिकन डॉलरवर पोहोचले.

फोर्ब्जच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत जॅक मा जगात १८ व्या क्रमांकावर असून आशिया खंडात पहिल्या क्रमांकावर आहेत.
जॅक मा म्हणतात, जेव्हा तुमच्याकडे पैसा असतो तेव्हा तुमच्या आजुबाजूला खूप जण असतात. अशावेळी अनेकजण तुमच्या पैशांबाबत चौकशीही करतात. पण आपल्याला मिळत असलेला पैसा हा आपण राहत असलेल्या समाजाचे देणे लागतो असे त्यांचे म्हणणे आहे. जॅक मा स्वतःला केवळ पैसाच नाही तर सत्ता आणि प्रसिद्धीपासूनही दूर ठेवतात. ऑफिसमध्ये तुम्ही सत्ता घेऊन वावरलात, खिशात पैसे घेऊन फिरलात आणि प्रसिद्धीच्या मागे धावलात तर तुम्ही अडचणीत येऊ शकता, असे मा यांचे म्हणणे आहे.

अलीबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेड चीनमध्ये आपली नवीन कार्यालये सुरु करत आहेत. नुकताच अलीबाबा कंपनीचा १८ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी जॅक मा यांनी मायकल जॅक्सनच्या बिट्सवर अतिशय उत्तम असा डान्स केला. त्यांच्या या डान्समुळे त्यांचे अनोखे रूप पाहायला मिळाले.

Story img Loader