Ask Sachin Twitter: भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचं स्वप्न अखेर साकार झालं आहे. एक वर्ष मुंबई इंडियन्सच्या डगआऊटमध्ये बसून असलेल्या अर्जुन तेंडुलकरला यंदा १६ एप्रिलला पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सच्या अंतिम ११ जणांच्या संघात स्थान मिळालं आहे. १६ एप्रिलला अर्जुन तेंडुलकरने इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत पदार्पण केलं आहे. अर्जुनच्या पहिल्या सामन्यानंतर जगभरातून विविध प्रतिक्रिया समोर आल्या. सचिनने अर्जुनच्या पहिल्या विकेटनंतर फायनली तेंडुलकरला सुद्धा विकेट मिळाली असे म्हणत पोस्ट केली होती. आता अर्जुनचे कौतुक करणाऱ्या सचिनला जेव्हा अर्जुनने पहिल्यांदा आपण क्रिकेटमध्ये करिअर करू इच्छितो असे सांगितले होते तेव्हा मात्र त्याची प्रतिक्रिया वेगळीच होती.

आज, सचिन तेंडुलकरने ट्विटरवर #AskSachin हे खास सेशन घेतले ज्यामध्ये त्याने चाहत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यात एका चाहत्याने सचिनला विचारले होते की जेव्हा “अर्जुनने तो ही तुझ्यासारखा प्रोफेशनल क्रिकेट खेळू इच्छितो हे सांगितले तेव्हा तू त्याला पहिली प्रतिक्रिया काय दिलीस? असे विचारले होते. यावर उत्तर देताना सचिनने अवघ्या तीन शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. “तुझं नक्की आहे? एवढेच मी त्याला विचारले” असे सचिनने चाहत्याला उत्तर दिले आहे.

जेव्हा सचिनला अर्जुनने सांगितलं, “मी पण क्रिकेट खेळणार”

हे ही वाचा<< “सचिन तेंडुलकरमुळे १००९ धावा करणाऱ्या ‘त्या’ खेळाडूवर अन्याय…”अर्जुनचा फोटो लावून संतापजनक पोस्ट

दरम्यान, अर्जुनला २०२१ मध्ये मुंबई इंडियन्सने २० लाख रुपये इतक्या बेस प्राईसवर खरेदी केलं होतं. त्यानंतर २०२३ मध्ये मुंबईने त्याला २५ लाख रुपये इतक्या किंमतीत पुन्हा खरेदी केलं.