संकट, अडचणी, दुख: प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. पण त्यावर मात करून पुढे जातो त्यालाचा यश, आनंद आणि समाधान मिळते. आपल्या आसपास असे अनेक लोक असतात जे अशक्यप्राय परिस्थितीवर मात करून आनंदाने आयुष्य जगतात. अशाच एका व्यक्तीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ कोलकात्यातील एका व्यक्तीचा आहे ज्याला ब्रेन स्ट्रोकमुळे त्याला बाईक चालवण्याची आवड जोपासता येत नाही. प्रदीप पायणे यांना तब्येत बिघडल्यानंतर बाईक चालवण्यास मनाई करण्यात आली. पण या बाईकवेड्या व्यक्तीने हार मानली नाही. आपल्या सायकला बाईकचे स्वरुप दिले आहे.
या व्यक्तीचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर @shutter_bong ने शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनणमध्ये सांगितले की, “नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर, प्रदीप पायणे यांना सेरेब्रल अटॅक (cerebral attack ) आला आणि त्यांना कधीही बाईक चालवू नका असा सल्ला डॉक्टरांनी दिला. आपल्या आवडत्या बाईकपासून दूर राहावे लागल्याने त्यांची निराशा झाली पण त्यांनी हार मानली नाही त्यांच्या सायकलमध्ये बाईकचा शोध घेण्यास सुरुवात केली.”
हेही वाचा – खेळता खेळता हरवला १२ वर्षाचा चिमुकला! QR code पेंडेंटमुळे पुन्हा पालकांना भेटला! ८ तासात पोलिसांनी लावला शोध
आपल्या सायकलचे रुप त्यांनी असे पालटके जिथे जाईल तिथे सर्वजण सायकडे वळून पाहतात. आपल्या सायकलला त्यांनी व्हायब्रंट रंग दिला आहे त्याचबरोबर सायकलला टूलकिट, पाण्याची टाकी, पंखा जोडला आहे. एवढचं नाही तर बाईकप्रमाणे वैयक्तिक नंबर प्लेटही सायकला जोडली आहे.
ब्रेन स्टोकचा त्रास होत असूनही हा बाईकवेडा व्यक्ती सायंकाळच्या वेळी कोलकात्याच्या रस्त्यांवर विशेषतः कुमारतुलीच्या आसपास फिरताना दिसतो.
हेही वाचा – चंद्राभोवती घिरट्या घालतेय UFO? नासाने शेअर केला रहस्यमयी फोटो, नक्की काय आहे प्रकरण?
सोशल मीडिया वापरकर्त्यांनी कमेंटमध्ये प्रदीप पायणे यांच्या बाईक प्रेमाचे कौतुक केले आहे. एकाने म्हटले की, “कोलकाता माणूस साधेपणा आणि लोक छोट्या छोट्या गोष्टींनी खूप आनंदी असतात सुंदर.” आणखी एकाने लिहिले, “हे खरोखर सुंदर आहे! येथे राहणाऱ्या गोंडस आणि अद्वितीय लोकांमुळे हे शहर सर्वात गोंडस आहे..” आणि तिसऱ्या वापरकर्त्याने “ऑल द बेस्ट. खूप आवश्यक पुढाकार. तुम्हाला अधिक शक्ती देवो.