आसामच्या गुवाहाटीमध्ये दिवसा उजेडी एक घटना घडली ज्यामध्ये महिलीने त्याच क्षणी प्रसंगावधान दाखवले. आपल्याला पकडायला आलेल्या व्यक्तीच्या स्कूटीला पकडले आणि मागीच टायर उचलत त्याला खड्ड्यात ढकले भावना कश्यप या महिलेने या या घटनेचा तपशीलवार तपशील फेसबुक पोस्टमध्ये दिला आहे. त्या पोस्टमध्ये तिने आपला राग आणि हल्लेखोराप्रतीचा तिरस्कार व्यक्त केला आहे.
नक्की काय घडलं?
तिच्या पोस्टमध्ये भावना कश्यप म्हणाली की, ती व्यक्ती शहरातील सर्वात व्यस्त असणाऱ्या रस्त्यावर तिच्याजवळ आली. जेव्हा ती म्हणाली की तिला ऐकू येत नाही, तेव्हा तो जवळ आला आणि त्याने विचारले की, “सिनाकी मार्ग कुठे आहे?” तिने उत्तर दिले की तिला माहिती नाही आणि त्याने दुसर्याला विचारावे असे सुचवले. दुसऱ्याच क्षणी, त्याने तिला पकडले आणि शरीरावर नको त्या ठिकाणी स्पर्श केला. त्याने तिला पकडल्यावर एका सेकंदाने भावनाला नुकतेच काय घडले याची जाणीव झाली.
भावनाने त्याला पळून जाऊ दिले नाही
या घटनेनंतर जेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने त्वरीत कृती केली.”मी दुसरा कोणताही विचार न करता अशा विचित्र परिस्थितीत माझ्या शरीरात असलेली संपूर्ण शक्तीने त्याला ओढले. तो आपली स्कूटी वर चढवत राहिला, मी त्याचा मागचा टायर उचलत राहिले आणि शेवटी त्याला खाली नाल्यात ओढण्यासाठी धक्का दिला.” कश्यपने लिहिले.
ती म्हणाली की जर तिने त्याला दूर जाऊ दिले असते तर त्याने आणखी महिलांना लक्ष्य केले असते.तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की या घटनेनंतर लोक जमू लागतात. जमलेल्या लोकांनकडे हल्लेखोर आपली स्कूटी बाहेर काढण्यासाठी मदतीसाठी विनवणी करतो पण प्रत्येजण नकार देतो. उपस्थित लोकांना त्याने काय केले आहे हे समजल्यावर त्याला पोलिसात दिले पाहिजे असं मत व्यक्त करतानाही दिसून येत आहेत.
With ref. to the heinous incident of assault in Rukmini Nagar under Dispur PS – FIR 2719/21 has been registered, the accused arrested & forwarded.
The case will be brought to its logical conclusion & justice served.
We are committed to the safety & security of our citizens. pic.twitter.com/3gRHzodlqa
— Guwahati Police (@GuwahatiPol) July 31, 2021
पोलिसांची ट्विट करत माहिती
मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेल्या फेसबुक पोस्टमध्ये ती त्या व्यक्तीचे नाव सांगते आणि एक व्हिडिओही शेअर करते. ३० जुलै (शुक्रवार) रोजी घडलेल्या घटनेनंतर त्याला लगेच अटक करण्यात आली, असे गुवाहाटी पोलिसांनी ट्विट केले आहे.”दिसपूर पीएस अंतर्गत रुक्मिणी नगरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या घटनेच्या संदर्भात एफआयआर २७१९/२१ नोंदवण्यात आला आहे, आरोपीला अटक करून पुढे पाठवण्यात आले आहे. प्रकरण तार्किक निष्कर्षावर आणले जाईल आणि न्याय दिला जाईल. आम्ही आमच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वचनबद्ध आहोत.”असे पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
काही क्षणांनी पोलीस आले आणि हल्लेखोराला घेऊन गेले. या संबंधी भावनाने पोलिसांचे आभार मानले आहेत.