आसामच्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत असून तिला एका नायकाच्या रूपात सन्मानित केले जात आहे. या कर्मचाऱ्याने सिद्ध केले आहे की तिच्यासाठी तिचे कर्तव्य सर्वतोपरी आहे. या महिला पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या कथित गुन्ह्यांची माहिती मिळताच, कोणताही विचार न करता त्याच्यावर कारवाई केली.
नॉर्थ ईस्ट क्रॉनिकलनुसार, जुनमोनी राभा या नागांव जिल्ह्यात सब इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी फसवणुकीच्या गुन्ह्याखाली आपल्या होणाऱ्या नवऱ्याला अटक केली आहे. विशेष म्हणजे, जानेवारी २०२१ मध्ये राभा माजुली येथे तैनात होती तेव्हा ती राणा पोगाग नावाच्या व्यक्तीला भेटली. राभाने माध्यमांशी सांगितले की, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी राणा पोगागसोबत साखरपुडा केला आणि येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात त्यांचे लग्न होणार होते.
तथापि, जुनमोनी राभाला समजले की राणाने ऑईल इंडिया लिमिटेडचा पीआर असल्याचे सांगून अनेकांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन फसवले आहे. त्यांनी सांगितले की पोगागच्या घरातून ओएनजीसीचे ११ बनावट सील आणि ओळखपत्रांसह अनेक कागदपत्रे जप्त केली. राभा म्हणाली, “मी त्या तिघांची ऋणी आहे जे राणा पोगगबद्दल माहिती घेऊन माझ्याकडे आले, त्याची सत्यता मला सांगितली. त्यांनी माझे डोळे उघडले.”
“कॅमेरामध्येच घुसून राहू का?” सततच्या व्हिडीओ शूटिंगला कंटाळलेल्या मुलाने वडिलांनाच धरलं धारेवर
या वर्षाच्या सुरुवातीला देखील, आमदार अमिया कुमार भुयान यांच्याशी टेलिफोनिक संभाषण सोशल मीडियावर लीक झाल्यानंतर जुनमोनी राभा चर्चेत आल्या होत्या. आपल्या मतदार संघातील लोकांना त्रास देऊ नये असे त्या आमदाराने राभा यांना बजावले होते. मात्र राभा यांनी त्यांच्यासमोर झुकण्यास नकार देत सरकारने घालून दिलेले नियम मोडल्याबद्दल त्या आमदाराला जाब विचारला.