Sunita Williams Dances In Joy As She Returns To International Space Station : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचा क्रूमेट बुच विल्मोर यांच्यासह बोइंग स्टारलाइनर अंतराळ यानाने गुरुवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) सुरक्षितपणे पोहोचल्या. अशाप्रकारे ५९ वर्षीय अंतराळवीर सुनीता विल्यम्स आपल्या नवीन क्रू स्पेसक्राफ्टचे उड्डाण करत चाचणी करणारी पहिली महिला ठरली आहे. सुनीता विल्यम्स पहिल्यांदाच आपल्याबरोबर गणपतीची मूर्ती आणि भगवद्गीता अंतराळात घेऊन पोहोचल्या. अंतराळ स्थानकावर पोहोचताच त्या आनंदाने उड्या मारू लागल्या. सहकाऱ्यांना पाहताच त्यांनी जबरदस्त डान्स केला, यानंतर हसतमुख चेहऱ्याने सर्व अंतराळवीरांची गळाभेट घेतली. अंतराळ स्थानकात पोहोचल्यानंतरचा सुनीता विल्यम्स यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घंटा वाजवत झाले स्वागत

अंतराळ स्थानकावर पोहोचल्यानंतर सुनीता आणि विल्मोर यांचे घंटा वाजवून स्वागत करण्यात आले, ही आयएसएसची प्रदीर्घ परंपरा आहे. जेव्हा एखादा नवीन अंतराळवीर अंतराळ स्थानकावर येतो तेव्हा इतर अंतराळवीर घंटा वाजवून त्यांचे स्वागत करतात. सुनीता विल्यम्स यांचेही उत्तम स्वागत झाले, यावेळी त्या आनंदाने नाचत आल्या आणि सहकाऱ्यांच्या दिशेने गेल्या व त्यांना मिठी मारली. यावेळी सुनीता विल्यम्स म्हणाल्या की, गोष्ट पुढे नेण्याचा हा मार्ग आहे, आयएसएसचे सदस्य माझे दुसरे कुटुंब आहे, त्यांनी खूप छान स्वागत केले, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. अशाप्रकारे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे बोईंगच्या स्टारलाइनर यानातून अंतराळात जाणारे पहिले अंतराळवीर ठरले आहेत.

स्टारलाइनर अंतराळयानाचे प्रक्षेपणानंतर २६ तासांनी डॅकिंग

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे स्टारलाइनर अंतराळयान फ्लोरिडामधील केप कॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून प्रक्षेपित झाले, ज्यानंतर सुमारे २६ तासांनंतर ते अंतराळात स्थानकावर यशस्वीरित्या डॉक झाले. रिॲक्शन कंट्रोल थ्रस्टरच्या समस्येमुळे पहिल्या प्रयत्नात ते डॉक करू शकले नाही. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात यानाला स्पेस स्टेशनशी डॉकिंग करण्यात यश आले.

‘ती’ मिठी ठरली शेवटची! पुराच्या पाण्यात अडकले अन् ‘असा’ झाला तीन जिगरी दोस्तांचा करुण अंत; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर स्टारलाइनर अंतराळयानाच्या उपप्रणालीची चाचणी घेण्यासाठी आठवडाभर स्पेस स्टेशनवर राहतील. यावेळी ते अंतराळवीरांना विविध चाचण्यांमध्ये मदत करतील आणि वैज्ञानिक प्रयोग करतील.

सुनीता विल्यम्स यांचा परिचय

सुनीता विल्यम्स यांनी १९८७ मध्ये यूएस नेव्हल अकादमीतून पदवी घेतली. त्यानंतर त्यांची नासामध्ये अंतरळवीर म्हणून निवड झाली. त्यांचे वडील दीपक पांड्या या अहमदाबादमधून अमेरिकेत स्थायिक झाले होते. सुनीता विल्यम्स यांचा जन्म १९६५ मध्ये झाला. यूएस नेव्हल अकादमीतून पदवी घेतलेल्या सुनीता विल्यम्स यांनी लढाऊ विमानंही उडवली आहेत. त्यांनी ३० प्रकारच्या लढाऊ विमानांवर तीन हजार तासांपेक्षा अधिक उड्डाणांचा अनुभव आहे. सुनीत विल्यम्स यांनी मायकेल विल्यम्स यांच्याशी लग्न केलं. मायकेल हे टेक्सासमध्ये पोलीस अधिकारी होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astronaut sunita williams dancing on her arrival at international space station after starliner mission watch viral video sjr
Show comments