जर तुम्हाला असं वाटत असेल की ब्लुपर्स मूमेंट फक्त चित्रपट, टीव्ही शो आणि न्यूज चॅनेलपुरते मर्यादित असतात, तर तुम्ही हा व्हिडीओ तुमच्यासाठी एखाद्या सरप्राईजपेक्षाही कमी नाही. टीव्ही क्षेत्राप्रमाणेच इतर क्षेत्रातील लोक देखील कामाच्या दरम्यान हास्यास्पद चुका करतात. यामध्ये चंद्रावर गेलेल्या अंतराळवीरांचाही समावेश आहे. आता तुम्ही म्हणाल चंद्रावर जात असताना इतकी परफेक्ट ट्रेनिंग घेऊन ते जात असतात, मग त्यांच्याकडून चूक कशा काय होतील? तर मग हा व्हिडीओ एकदा पाहाच. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही, हे मात्र नक्की.

मानवाने चंद्रांवर आपलं पहिलं पाऊल ठेवलं १९६९ मध्ये ठेवलं आणि शेवटचं १९७२ मध्ये हा प्रयत्न झाला. अपोलो 17 जी शेवटची मून लॅण्डिंग मोहीम होती, त्यात अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागावरील नमुने गोळा करताना दिसून आले. आपल्यापैकी बहुतेकांनी नवीन गुरुत्वाकर्षणामुळे चंद्रावर मंद गतीने फिरणाऱ्या किंवा उडी मारणाऱ्या अंतराळवीरांच्या मूनवॉकचे वेगवेगळे व्हिडीओ पाहिले असतील, पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो मून वॉक करतानाच्या ‘ब्लूपर्स’चा आहे.

आणखी वाचा : बाटलीने दूध पितं हे हत्तीचं पिल्लू, VIRAL VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, “खूपच क्यूट”

ब्लॅक होल नावाच्या ट्विटर पेजवरून हा अवघ्या १३ सेकंदाचा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. “नासाचे अंतराळवीर चंद्रावर चालत असताना त्यांचा पाय घसरला” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये अंतराळवीर चंद्रावर चालत असताना काही पाय घसरून पडले असल्याचं दाखवण्यात आलंय. जरी नासाच्या अधिकृत सोशल मीडिया प्रोफाइलवरून हा व्हिडीओ शेअर केला गेला नसला तरी त्यावर अनेक नेटिझन्स चर्चा करताना दिसून येत आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : निर्दयी आई! गृहपाठ केला नाही म्हणून हात पाय बांधून तळपत्या छतावर झोपवलं

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : अरेरे! न जाणे काय दुर्बुद्धी सुचली; पिंजऱ्यातल्या Orangutan ची छेड काढली, मग चांगलीच अद्दल घडवली, पाहा VIRAL VIDEO

७ जून रोजी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की अवघ्या दोन दिवसांतच या व्हिडीओला ४.४७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एका यूजरने या व्हिडीओवर खिल्ली उडवली आहे. यावर कमेंट करताना त्याने लिहिले की, “जेव्हा तुम्हाला मून वॉक कसा करायचा हे माहित नसते तेव्हा असे होते.” लोक या व्हिडीओचा आनंद घेत आहेत. या व्हिडीओच्या सत्यतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे अनेकजण आहेत. या व्हिडीओमध्ये धूळ वाहताना दिसून येत असून ती कमी गुरुत्वाकर्षणामुळे चंद्रावर येणे शक्य नसल्यामुळे हा व्हिडीओ खोटा असल्याचा काहींचा दावा आहे.

Story img Loader