तुम्ही ‘डब्यूडब्यूई’मधील योद्धा असणाऱ्या द ग्रेट खलीची एक प्रसिद्ध जाहिरात नक्कीच पाहिली असेल. एका सिमेंट कंपनीच्या या जाहिरातीमध्ये उंची अधिक असल्याने होणारा त्रास आणि त्यातून होणाऱ्या गंमतीजमती दाखवण्यात आल्या आहेत. मात्र या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलेल्या खलीप्रमाणे अमृतसरमधील जगदीप सिंग यांचे आयुष्य आहे. असं म्हणण्याचं मुख्य कारण वाहतूक पोलीस असणाऱ्या जगदीप यांची उंची चक्क ७ फूट ६ इंच इतकी आहे. विशेष म्हणजे इतकी उंची असणारे ते केवळ भारतातीलच नाही तर जगातील सर्वाधिक उंची असणारे पोलीस अधिकारी ठरले आहेत.

जगदीप सिंग यांना चक्क १९ क्रमांकाचा बूट वापरावा लागतो इतक्या मोठा आकाराचे त्यांचे पाय आहेत. हे बूट त्यांना परदेशातून मागवावे लागतात. आता यावरुनच तुम्ही त्यांच्या उंचीचा अंदाज आला असेल. आपल्या असामान्य उंचीमुळे त्यांना आपले कपडे शिवूनच घ्यावे लागतात. जगदीप यांच्या आधी हरियाणामधील राजेश कुमार यांची ओळख जगातील सर्वाधिक उंची असणारा पोलीस अधिकारी अशी होती. राजेश यांची उंची ७ फूट ४ इंच इतकी होती. मात्र जगदीप हा राजेश यांच्याहून २ इंचाने उंच आहेत. द ग्रेट खलीची उंची ७ फूट १ इंच इतकी आहे. मोटरसायकलची उंची जगदीप यांच्या गुडघ्यापर्यंतच भरते तर बसच्या बाजूला जगदीप उभे राहिल्याच त्यांचा चेहरा थेट चालकाच्या बाजूच्या खिडकीजवळ असतो इतके ते उंच आहेत.

Achole Police Station, English Lessons,
वसई : आता पोलीसही बोलणार फाडफाड इंग्रजी, पोलीस ठाण्यात भरतेय ‘इंग्रजीची शाळा’
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Vasai, Bhayandar police , Vasai, Bhayandar police force,
वसई, भाईंदर पोलीस दलात मोठे फेरबदल; ३ अधिकारी परतले, ६ नवीन अधिकारी झाले कायम
fraud with senior citizen, pretending army officer,
लष्करी अधिकारी असल्याच्या बतावणीने ज्येष्ठाची पाच लाखांची फसवणूक
punjab kings new captain announced in 18 big boss
‘पंजाब किंग्ज’च्या नव्या कर्णधाराचे नाव ‘बिग बॉस १८’ मध्ये झाले जाहीर; ‘या’ स्टार खेळाडूकडे सोपवली धुरा
Dhananjay Deshmukh On Santosh Deshmukh Case
Dhananjay Deshmukh : “…अन्यथा टॉवरवर चढून मी स्वतः ला संपवून घेणार”, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची संतप्त प्रतिक्रिया
Bigg Boss 18 Bigg Boss angry after Vivian dsena can chum darang refused to accept the ticket to final
Bigg Boss 18: विवियन डिसेना, चुम दरांगच्या ‘या’ निर्णयामुळे भडकले ‘बिग बॉस’; सर्व सदस्यांना दिल्या दोन शिक्षा
forest minister ganesh naik slams eknath shinde working style during cm tenure
शिंदेशाहीतील चुकांची उजळणी करत नाईकांचे वर्चस्वाचे संकेत

मागील दोन दशकांपासून जगदीप हे पोलीस खात्यामध्ये काम करतात. आपल्या उंचीमुळे जगदीप संपूर्ण पोलीस खात्यामध्ये लोकप्रिय आहे. ‘सर्वात उंच पोलीस अधिकारी असण्याचा मला अभिमान आहे. माझी उंची ७ फूट ६ इंच इतकी आहे तर माझे वजन १९० किलो आहे. मला याचा खूप आनंद होतो,’ असं ‘डेली मेल’शी बोलताना जगदीप यांनी सांगितले आहे.

इतकी उंची असण्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत असं जगदीप सांगतात. उंचीमुळे होणाऱ्या तोट्यांबद्दल बोलताना जगदीप म्हणतात, ‘उंचीमुळे मला अनेक अडचणींचा समाना करावा लागतो. मला माझ्या आकाराचे कपडे मिळत नाही. मला सर्वजनिक तसेच सामान्य आकाराचे प्रसाधनगृह वापरता येत नाही. इतकच काय तर मला माझ्याच गाडीने प्रवास करावा लागतो. उंची जास्त असल्याने मला टॅक्सी किंवा बसने प्रवास करणे शक्य नाही. या गाड्या माझ्यासाठी अगदीच लहान आहेत.’ दैनंदिन जिवनातील अडचणींबरोबर खाजगी आयुष्यातही उंचीमुळे अडचणी येत असल्याचे जगदीप सांगतात. ‘उंचीमुळे लग्नाच्या वेळेसही मला अनेक अडचणींचा समाना करावा लागला. मला माझ्या उंचीला साजेशी मुलगीच मिळत नव्हती. कोणीही मला त्यांची मुलगी देण्यास तयार होतं नव्हते. अनेकांना माझी उंची जरा जास्तच असल्याचे सांगितले होते,’ असं जगदीप सांगतात.

अखेर जगदीप यांचे लग्न सुखबीर कौर यांच्याशी झाले. सुखबीर या ५ फूट ११ इंच उंचीच्या आहेत, मात्र त्यांना जगदीप यांची उंची कधी खटकली नाही. ‘पंजाबमधील सर्वात उंच पुरुषाशी माझं लग्न झालं आहे याचा मला अभिमान आहे,’ असं सुखबीर सांगतात. तसचं नवऱ्याबरोबर बाहेर फिरायला गेल्यास आम्हाला सेलिब्रिटीसारखी वागणूक मिळते असंही सुखबीर यांनी सांगितले. ‘अनेकजण आमच्याबरोबर फोटो क्लिक करतात. मला याचा आनंद वाटतो. भारतातच काय पण जगातही त्यांच्या इतकी उंची असणारा कोणी पुरुष नसेल,’ असं मत सुखबीर यांनी ‘डेली मेल’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मांडले. माझ्या उंचीसाठी गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले जाईल अशी अपेक्षा मला असल्याचे जगदीप सांगतात.

Story img Loader