वय वर्ष चार असताना तुम्ही कधी पुस्तके वाचलेली आठवतंय का तुम्हाला? या वयात कसले आलेय वाचन? या वयात अ, आ, इ, ई किंवा A, B, C, D गिरवताना मुलं किती कंटाळा करतात त्या वयात पुस्तके कोण वाचेल? पण कधी कधी एखाद दुसरे मुलं याला अपवाद असतेच.

वाचा : १४ वर्षांच्या हर्षवर्धनसोबत गुजरात सरकारचा ५ कोटींचा करार!

जॉर्जियामध्ये राहणारी डालिया अशी मुलगी आहे जी फक्त ४ वर्षांची आहे आणि आतापर्यंत तिने १०, २० नाही तर चक्क १ हजार पुस्तके वाचली आहेत. या मुलीने वॉश्टिंनच्या काँग्रेस ग्रंथालयात एक दिवसीय ग्रंथपाल म्हणूनही भेट दिली. चार वर्षांची मुलगी पुस्तके वाचू शकते यावर कोणाचाही विश्वास बसेना पण तिच्या आईने तिचा एक पुस्तक वाचतानाचा व्हिडिओही शेअर केला. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत डालिया ही अडीच वर्षांची असल्यापासून पुस्तक वाचत असल्याचे तिच्या आईने सांगितले. लहान मुलांमध्ये पुस्तकाप्रती जास्तीत जास्त आवड निर्माण व्हावी यासाठी डालियाच्या आईने तिला पुस्तके वाचण्याच्या क्लासमध्ये घातले. या क्लासमध्ये आतापर्यंत तिने एक हजारांहून अधिक पुस्तके वाचली असल्याची नोंद आहे.

VIDEO : पाच वर्षांचा मुलगा दर महिन्याला कमावतो कोट्यवधी

तिच्याकडील या कौशल्यामुळे तिला वॉश्टिंनमधल्या काँग्रेस ग्रंथालयात एक दिवसीय ग्रंथपाल होण्याचा मानही मिळाला. तिथल्या ग्रंथपाल कार्ला हेडन यांनी या मुलीसोबत आपला फोटो ट्विटरवर शेअर केला. छोट्या डालियासोबत एक दिवस काम करून मला खूप आनंद झाला अशा प्रकारचे ट्विट त्यांनी केले.

Story img Loader