गेल्या वर्षभरापासून करोनाने जगभर कहर केला आहे. या वर्षी आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेतून आपला देश सावरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी लावण्यात आलेले लॅाकडाऊनचे निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. असं असलं तरीही अद्याप राज्यात चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा ‘पावनखिंड’ हा भव्य-दिव्य आणि ऐतिहासिक चित्रपट १८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ने बॉक्स ऑफिसवर धमाका करत आपण कुठेच कमी नसल्याचं दाखवून दिलं. मराठा योद्ध्यांची शौर्यगाथा असलेल्या ‘पावनखिंड’नं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. सध्या सोशल मीडियावर याच चित्रपटाची चर्चा आहे. चित्रपटाविषयी अनेक गोष्टी, पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत. दरम्यान चित्रपटगृहातील एक आगळा वेगळा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

(हे ही वाचा: “गडपती, गजअश्वपती, भूपती…” पावनखिंड चित्रपटाच्या वेळी चित्रपटगृहात शिवगर्जना देणाऱ्या तरुणाचा Video Viral)

काय आहे व्हिडीओमध्ये?

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये चित्रपटगृहात पावनखिंड चित्रपट सुरु होताच क्षत्रिय परिवार सांगली या समूहाने शिवगर्जना देत आहे. या व्हिडीओ पाहून नक्कीच तुमच्या अंगावर काटा येईल. अवघ्या ३६ सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. ‘हिस्ट्री’ या युट्युब चॅनेलवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

(हे ही वाचा: ६२ वर्षांची हिरकणी… रॅपलिंग करत आजीबाईंनी सर केलं पश्चिम घाटातील सर्वात खडतर शिखर)

(हे ही वाचा: तुफान वादळात लँडिंग करताना कॉकपिटमधलं थरारक दृश्य दाखवणारा Video Viral)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

या व्हिडीओला आत्तापर्यंत २.५ लाख लोकांनी बघितलं आहे. १५ हजाराहून जास्त लोकांनी याला पसंती दर्शवली आहे तर, अनेकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: At the time of pavankhind movie shivgarjana was given by the youth in sangli cinema video viral ttg