Viral Video: सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून यादरम्यानचे विविध व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. ज्यात कधी नवरा लग्नात हटके एंट्री घेताना दिसतो तर कधी वधू-वर नाचताना दिसतात. लग्नातील असे हटके व्हिडीओ नेहमीच खूप चर्चेत असतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून अनेक जण यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

लग्नातल्या वरातीत अनेक जण बेभान होऊन नाचतात. यावेळी ते नाचण्याच्या नादात कधी काय करतात याकडे त्यांना भानदेखील नसते. यादरम्यानचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. नुकत्याच व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्येदेखील असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

Surbhi Jyoti Sumit Suri got married
‘कबूल है’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, देवभूमीतील नॅशनल पार्कमध्ये केलं लग्न, फोटो आले समोर
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Funny video Woman on instagram got 30 million views video viral on social media
ना अश्लील डान्स ना स्टंटबाजी; तरी ३० कोटी लोकांनी का पाहिला असावा हा VIDEO? महिलेने असं काय केलं तुम्हीच पाहा
Arranged Marriage Goals
“Arranged Marriage असं गाजवा की लोकांना Love Marriage वाटलं पाहिजे!”, हळद लागताच नवरा-नवरीने केला भन्नाट डान्स, Video Viral
a woman lifted her drunken husband on her shoulders
शेवटी बायको ही बायकोच असते! दारू पिऊन भररस्त्यात पडलेल्या नवऱ्याला खांद्यावर उचलून घरी नेले, Viral होतोय Video
Wedding bride dance video bride on song honar sun mi ya gharachi dance after seeing his groom on stage bride video
VIDEO: “होणार सून मी या घरची” नवरीनं नवरदेवासाठी केला भन्नाट डान्स; सासरची मंडळीही पाहतच राहिली
viral video of bride is crying papa papa at the end of her wedding video high voltage drama
“अरेंज मॅरेज किती भीतीदायक आहे” नवरीच्या पाठवणीचा ‘हा’ VIDEO पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
young boy dance obscenely in front of mother
बापरे! आईसमोर अश्लील डान्स करणं पडलं महागात; गावासमोर दिला बेदम चोप, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “याची मस्ती…”

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका लग्नाच्या वरातीत काही ढोलवादक ढोल वाजवताना दिसत आहेत, शिवाय अनेक महिला आणि पुरुषदेखील या ठिकाणी नाचताना दिसत आहेत. यावेळी अचानक एक ढोलवादक येतो आणि तिथे नाचणाऱ्या एका महिलेच्या कंबरेला पकडून तिला त्याच्या ढोलवर बसवतो आणि तो मोठमोठ्याने ढोल वाजवतो. यावेळी ती ढोलवर बसणारी महिलादेखील बेभान होवून नाचते. हा प्रकार पाहून शेजारी नाचत असलेली दुसरी महिला त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण यावेळी तो तिला दाद देत नाही. त्यानंतर ती त्याच्या हाताला पडकते आणि पुन्हा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, त्यावेळी आणखी एक जण तिथे येऊन त्याला थांबवतो आणि पुन्हा असं करू नको असं सांगतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ X (पूर्वीचे ट्विटर) वर स्कूप बीट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संस्थापक दिव्या गंडोत्रा टंडन यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “ढोलवादकाला त्या बाईला कोणी उचलायला सांगितले? प्रत्येक जण चांगल्या मूडमध्ये असल्याचे दिसत होते आणि ते खराब करू इच्छित नव्हते, परंतु काकूंनी ठाम भूमिका घेऊन त्या ढोलवादकाला नाही म्हणून चांगले काम केले.”

हेही वाचा: अय्या, हे कसलं लंडन; बसमध्ये चढताना नागरिकांचा बेशिस्तपणा; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “इथे पण मुंबईसारखी गर्दी”

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, या व्हिडीओवर आतापर्यंत जवळपास एक मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत शिवाय यावर एक हजारांहून लाइक्स मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेक जण कमेंट्स करताना दिसत आहेत. यावर एकाने लिहिलंय की, हा ढोलवादक हे कृत्य मुद्दाम करून अश्लीलता करतोय. तर दुसऱ्याने लिहिलंय की, त्या काकींसाठी खूप आदर वाटतोय. तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, आजकाल हा नवीन ट्रेंड आहे, मुलीला ढोलवर बसवून ढोल वाजवतात.