लग्नाचा दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस असतो. आपल्यापैकी बरेच जण ते आपल्या संपूर्ण आयुष्यासाठी संस्मरणीय बनवण्याची एकही संधी सोडत नाहीत. या खास दिवसाची सर्व व्यवस्था करतो. यावेळी फोटो क्लिक करतो आणि व्हिडीओही शूट करतो. याच वेळी एखादा मजेजीर क्षण कॅमेऱ्यात कैद होतात. लग्नाचे काही मजेदार व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतात. एका जोडप्याचा असाच एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे, जो तुम्हाला नक्कीच हसवेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की काय झालं?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये वधू आणि वर त्यांच्या मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत मंडपात बसलेले दिसत आहे. पुजारी देखील त्यांच्यासाठी मंत्र जपत आहेत. यादरम्यान, वराने वधूच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यानंतर पंडितने असे काही बोलले की सर्वजण मोठ्याने हसायला लागले.

(हे ही वाचा: NASA ने शेअर केले Solar Flares चे अप्रतिम दृश्य; पाहा मंत्रमुग्ध करणारा व्हिडीओ)

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, वर वधूच्या खांद्यावर हात ठेवून आरामात बसलेला आहे. वधू देखील विरोध करत नाही आणि पुजारी बोलत असलेले मंत्र ऐकत असते. दरम्यान, पुजारी वधूच्या नावाने हाक मारतात, तेव्हाच त्याला वराचा हात दिसतो. यानंतर पंडित सर्वांसमोर वराला हात काढायला सांगतात.

(हे ही वाचा: Video: फक्त एका रुमालाने केली स्कूटीची चोरी; चोराची हटके पद्धत पाहून नेटीझन्स चक्रावले)

हा व्हिडीओ weddingbells2022_ या इंस्टाग्राम पेजवरून पोस्ट केला गेला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत ४५ हजार लोकांनी बघितला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: At the wedding the groom puts his hand on the bride shoulder and watch viral video ttg