Viral Video Shows Boys Dance Inside Atal Tunnel : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्धघाटन करण्यात लेल्या अटल बोगद्यामुळे मनाली आणि केलॉन्गमधील अंतर तीन ते चार तासांनी कमी झाले आहे. भारताच्या युद्धनीती विषयक धोरणांमध्ये हा बोगदा महत्वाचा भाग ठरणार आहे. हा जगातील सर्वात मोठा बोगदा आहे. पण सध्या त्याची जी अवस्था केली आहे ते पाहून संताप व्यक्त केला जात आहे. नुकताच मनालीच्या प्रसिद्ध अटल बोगद्यामधील घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये अटल बोगद्यामध्ये काही लोक नाचताना दिसत आहे. हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये, शेजारच्या राज्यांमधून आलेले काही लोक अटल बोगद्यात मोठ्या आवाजात गाणी वाजवून नाचत आहेत, कपडे काढून पुश-अप मारत असल्याचे दिसून येत आहे. तरुणांच्या या कृत्यावर रोष व्यक्त केला जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर नेटिझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्या. काही वापरकर्त्यांनी गोंधळ निर्माण केल्याबद्दल नाचणाऱ्यांवर टीका केली, तर काहींनी ते हिमाचलची अर्थव्यवस्था चालवतात असे म्हणत त्यांची खिल्ली उडवली.
एक्सवर @iNikhilsaini नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये उपाहासाहात्मक टिका करत लिहिले की,” “अटल बोगदा – एक अभियांत्रिकी चमत्कार! जेव्हा तो बांधले जात होता, तेव्हा भारतातील आणि परदेशातील उच्च अभियंत्यांनीही कल्पना केली नव्हती की, हा बोगदा एके दिवशी ‘सर्वात सुसंस्कृत’ लोकांसाठी नाईट क्लब ठरेल. गाणी लावून, अंगावरील कपडे काढून…, उत्कृष्ट नृत्य”
व्हायरल व्हिडिओवरील काही प्रतिक्रिया येथे आहेत:
व्हिडिओला प्रतिसाद देताना एका एक्स वापरकर्त्याने “अटल क्लब” अशी कमेंट केली आहे.
“आम्ही हिमाचलची अर्थव्यवस्था चालवतो,” दुसऱ्या वापरकर्त्याने उपाहात्मक कमेंट केली आहे.
बोगद्यात नाचणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटले “भयानक, परदेशात भारतीयांना घाणेरडे आणि उपद्रवी मानले जाते यात आश्चर्य नाही. त्यांना स्वतःच्या देशाचीही पर्वा नाही, अशा अद्भुत पायाभूत सुविधांचा वापर हे मूर्ख लोक अपमानजनक वर्तनासाठी करतात. त्यांचा शोध घ्या आणि त्यांना तुरूंगात टाका.”
एका वापरकर्त्याने असे निदर्शनास आणून दिले की, व्यक्तीने आनंदोत्सवाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला त्याने देखील कायदा मोडला कारण बोगद्यात फोटोग्राफी करण्यास मनाई आहे.
अटल बोगदा
अटल बोगदा हा ८० किलोमीटर प्रति तास वेगाने दररोज ३ हजार गाड्या १ हजार ५०० ट्रकच्या बाहतुकीसाठी डिझाईन करण्यात आला आहे. यामध्ये सेमी ट्रान्सवर्स व्हेंटिलेशन सिस्टम, एससीएडीए नियंत्रण अग्निशमन, अत्याधुनिक इलेक्ट्रो-मेकॅनिकल प्रणालीही देण्यात आली आहे. या बोगद्यात प्रत्येक ६० मीटर अंतरावर फायर हायड्रेट सिस्टम देण्यात आला आहे. तसंच प्रत्येक २५० मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमॅऱ्याच्या मदतीनं घटनांची माहिती मिळवणारी यंत्रणाही देण्यात आली आहे. भारताच्या युद्धनीती विषयक धोरणांमध्ये हा बोगदा महत्वाचा भाग ठरणार आहे. हा जगातील सर्वात मोठा बोगदा आहे.यामुळे भारतीय लष्कराला पाकिस्तान आणि चीन सीमेपर्यंत सहज प्रवेश करता येणार आहे. या बोगद्यामध्ये अनेक अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.अटल बोगदा हा हिमालयाच्या पीर पंजाल रेंजमध्ये समुद्र सपादीपासून १० हजार फुटांच्या उंचीवर आहे. या बोगद्यामुळे मनाली ते लेह हे अंतर ४६ किलोमीटर कमी झालं आहे.या बोगद्यामध्ये आपात्कालिन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठीही बोगदा तयार करण्यात आला आहे. तसंच हा बोगदा मुख्य बोगद्याच्या आतच आहे.