‘हेरा फेरी’ चित्रपटातलं ‘देने वाला जब भी देता, देता छप्पर फाड के’ नावाचं गाणं तुम्हाला आठवतंय का?  अशीच ‘छप्पर फाडके…’ प्रमाणे एक घटना नागपुरात घडली आहे. जर तुम्ही एटीएममधून १०० रुपये कॅश काढायला गेले आणि एटीएम तुम्हाला ५०० रुपये देत असेल तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल आणि सोबत तुम्ही आनंदाने उड्या माराल. असाच आनंद नागपुरातल्या एका व्यक्तीला अनुभवण्याची संधी मिळाली. ही बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरली आणि एटीएमपुढे लोकांनी लांबच लांब रांगा लावल्या. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यापासून ३० किमी दूर असलेल्या खापरखेडा इथलं आहे. इथल्या  खासगी बँकेच्या एटीएममध्ये झालेल्या काही तांत्रिक बिघाडामुळे एटीएममधून चक्क पाचपट रक्कम काढण्यास सुरुवात झाली. एका व्यक्तीने या एटीएममधून ५०० रुपये काढले, त्यानंतर एटीएमने त्याला ५००-५०० रूपयांच्या एकूण पाच नोटा काढून दिल्या. एका ग्राहकाच्या माहितीवरून स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी एटीएम बंद करून बँकेला या बिघाडाबाबत कळवले.

आणखी वाचा : त्सुनामी सारखे ढग तुम्ही कधी पाहिलेत का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : हैदराबादच्या रस्त्यावर ५००-५०० रूपयांच्या नोटांचा पाऊस, VIRAL VIDEO वर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा महापूर

नंतर खासगी बँकेने हे तांत्रिक बिघाडाचे प्रकरण असल्याचं सांगितलं. बँकेचे कर्मचारी एटीएम बॉक्समध्ये पैसे जमा करत असताना चूक झाली, त्यावेळी चुकून १०० रुपयांच्या बॉक्समध्ये ५०० रुपयांच्या नोटा ठेवण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत बँक ग्राहक एटीएममधून ५०० रुपये काढण्यासाठी आला असता, मशिनने त्याला शंभरच्या ऐवजी पाचशेच्या पाच नोटा दिल्या. याप्रकरणी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही.