August 2024 Bank Holidays List : जुलै महिना संपायला अवघा एक दिवस शिल्लक आहे, त्यानंतर ऑगस्ट महिना सुरू होईल. जर ऑगस्टमध्ये तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण ऑगस्ट महिन्यापासून सणासुदीला सुरुवात होत आहे. स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमीसह अनेक सण, उत्सव या महिन्यात साजरे होणार आहेत. यानिमित्ताने ऑगस्टमध्ये बँका एकूण १३ दिवस बंद राहणार आहेत. आरबीआयने ऑगस्टमधील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे, ज्यानुसार ऑगस्टमध्ये बँकांना तब्बल १३ दिवस सुट्ट्या असणार आहे.

विविध राज्यांमध्ये होणारे सण आणि विशेष प्रसंग लक्षात घेऊन या सुट्ट्यांचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे. पण, ऑगस्टमध्ये कोणत्या राज्यात, कोणत्या दिवशी बँका बंद असतील याची यादी आपण पाहू.

dengue malaria
कल्याण-डोंबिवलीत दोन महिन्यांत डेंग्यू, मलेरियाचे ३८७ रूग्ण; संशयित २० हजार नागरिकांच्या रक्ताची तपासणी
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
India likely to see heavy rainfall in September
“असना” वादळामुळे सप्टेंबर महिना अतिवृष्टीचा..!
Paytm share price
Paytm Share Price: पेटीएमच्या शेअरमध्ये १२ टक्क्यांची वाढ; पंतप्रधान मोदींनी क्युआर कोडची स्तुती केल्याबद्दल मानले आभार
heavy rain, heavy rain predicted for mumbai, Mumbai, Konkan, weather forecast, Thane, Palghar, heatwave, low pressure, Sindhudurg,
मुंबईत शनिवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज
three objections in 10 days about Panvel draft development plan
पनवेल प्रारूप विकास आराखड्याबद्दल १० दिवसांत अवघ्या तीन हरकती
Gold import decline due to CAD
सोने आयातीत घट; चार महिन्यांत ४.२३ टक्क्यांनी घसरून १२.६४ अब्ज डॉलरवर
rain, Mumbai, rain update mumbai,
मुंबईत पुढील काही दिवस हलक्या सरींची शक्यता

ऑगस्ट महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट ( August 2024 Bank Holidays Full List)

३ ऑगस्ट : केर पूजा – आगरतळामध्ये बँका बंद राहतील.
४ ऑगस्ट : रविवार – साप्ताहिक सुट्टी
८ ऑगस्ट : तेंडोंग लो राम फाट – सिक्कीममध्ये बँका बंद राहतील.
१० ऑगस्ट : शनिवार – दुसरा शनिवार
११ ऑगस्ट : रविवार – साप्ताहिक सुट्टी
१३ ऑगस्ट : देशभक्त दिवस – मणिपूरमध्ये बँका बंद राहतील.
१५ ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन/ पारशी नववर्ष- भारतातील सर्व बँका बंद राहणार आहेत.
१८ ऑगस्ट : रविवार – साप्ताहिक सुट्टी
१९ ऑगस्ट : रक्षाबंधन – त्रिपुरा, गुजरात, ओडिशा, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद राहतील.
२० ऑगस्ट : श्री नारायण गुरु जयंती – केरळमध्ये बँका बंद राहणार आहेत.
२४ ऑगस्ट : शनिवार – चौथा शनिवार
२५ ऑगस्ट : रविवार – साप्ताहिक सुट्टी
२६ ऑगस्ट : जन्माष्टमी – सर्व शहरांमध्ये बँका बंद राहणार आहेत.

Read More Bank Related News : SBI Recruitment 2024: एसबीआयमध्ये नोकरीची उत्तम संधी, ‘ही’ पदे जाणार भरली, पगार ८५ हजार, लगेचच ‘असा’ करा अर्ज

या सुट्ट्यांची लिस्ट लक्षात घेऊन तुम्ही बँकिंग संबंधित कामांचे नियोजन करू शकता. बँकेच्या सुट्ट्या राज्यानुसार बदलू शकतात. या दिवशी बँकांचे ऑनलाइन व्यवहार मात्र सुरू असणार आहेत. तुम्हाला सुट्ट्या बघून फिरायला जाण्याचे प्लॅन करायचे असल्यास त्यासाठीही हे पत्रक नक्की कामी येईल. पण, तुमच्या स्थानिक बँकांच्या सुट्ट्यांची माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँकेशी संपर्क साधा.