जुगाड हा भारतीय जीवनशैलीतील एक महत्त्वाचा भाग आहे. अनेकदा छोट्या मोठ्या कामांसाठी आवश्यक साधणे उपलब्ध नसतात तेव्हा कामी येतो तो जुगाड. कोणतीही समस्या असून द्या त्यावर जुगाड शोधला की काम झटक्यात होऊन जाते. जुगाड हा आपल्या भारतीयांच्या रोजच्या जीवनातील भाग आहे विशेषत:: गृहिणीच्या जीवनातील. संसार सांभाळताना गृहिंनीना अनेक गोष्टींची कमतरता भासते अशावेळी गृहिनी आपला जुगाड वापरून काम पूर्ण करतात. अनेकदा सोशल मीडियावर किचन जुगाड व्हायरल होत असतात जे महिलांचे तासभराचे काम झटक्यात पूर्ण करतात. हे जुगाड महिलांना दिवसभरातील हजारो कामांचा भार कमी करतात. जुगाड शोधल्याशिवाय महिलांचे कोणतेच काम पूर्ण होणार नाही. सध्या महिलांनी शोधलेल्या अफलातून जुगाडचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हाला प्रथम डोळ्यांवर विश्वास बसणार नाही आणि नंतर तुम्हाला पोटधरून हसण्यासाठी भाग पाडेल. चला तर मग जाणून घेऊ या काय आहे हा जुगाड.

व्हायरल फोटो इंस्टाग्रामवर marathi_pk_99 आणि marathi_memer_2.0 या खात्यावरून शेअर केला आहे. फोटोमध्ये एका टेरेसवर महिलांन वाळवण ऊनात वाळवण्यासाठी ठेवले आहे. पण त्या वाळवणाची राखण करण्यासाठी मात्र एक खेळण्यातील वाघ ठेवला आहे. होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. फोटो पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना झाले आहे.

tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Penguin politely waits for couple
माणसांपेक्षा प्राण्यांना जास्त कळतं? वाटेतून जोडपं बाजूला झालं अन्… पाहा पेंग्विनचा ‘हा’ Viral Video
Arvind kejriwal dr babasaheb ambedkars Fact Check marathi
अरविंद केजरीवालांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेले ‘ते’ आक्षेपार्ह विधान खरंच तसे आहे का? वाचा, VIRAL VIDEO ची खरी बाजू….
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून
Bride dance in her own wedding for groom after seeing his groom on stage bride video goes viral on social media
VIDEO “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” नवरीनं नवरदेवासाठी केला भन्नाट डान्स; पाहून नवरदेवही लाजला असेल

हेही वाचा –” वाईनच्या बाटल्या फेकल्या, वस्तू फेकल्या…मॉलमध्ये बेशिस्त चिमुकलीचा राडा!Viral Video पाहून तिच्या आई-वडीलांवर संतापले नेटकरी

U

U

उन्हाळ्यातील वाळवण हे गृहिणीचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. कितीही कामाचा व्याप असला तरी गृहिणी वेळात वेळ काढून उन्हाळ्यात वाळवणे आवर्जून करतात. कुरडई, पापड, सांडगे, लोणचं, शेवया असे कित्येक पदार्थ गृहिणी न चुकता दरवर्षी करतात. हे पदार्थ तयार करण्याचा व्याप खूप असतो पण त्यापेक्षा अवघड काम म्हणजे वाळवणाच्या पदार्थांची राखण करणे अन्यथा केलेली सगळी मेहनत वाया जाते. कारण जरा नजर हटेपर्यंत पक्षी वाळवणाच्या पदार्थांवर ताव मारतात आणि होत्याचे नव्हते होऊन जाते त्यामुळे उन्हाळ्यात वाळवणाची राखण करण्यासाठी एका व्यक्तीला बसवले जाते. ऑफिस, शाळा, नोकरी अशा धावपळीच्या जीवनशैलीतून वेळ काढूनही आज कालच्या महिला वाळवणे तयार करतात पण त्याची राखण करण्यासाठी दिवसभर कोणाकडेही वेळ नसतो. अशा परिस्थिती काय करावे असा प्रश्न महिलांना पडलेला असतो. व्हायरल फोटो याच प्रश्नाचे उत्तर देत आहे. फोटोमध्ये जो महिला मंडळाने जुगाड वापरला आहे तो भन्नाट आहे. फोटोमध्ये महिलांनी चक्क खेळण्यातील वाघ वाळवणा शेजारी ठेवला आहे ज्याच्या भीतीने पाखरू देखील वाळवणाजवळ फिरकणार नाही. वाघ खोटा आहे आपल्याला माहित आहे पण पक्ष्यांना कळणार नाही याचा फायदा घेऊन महिलांनी हा भन्नाट जुगाड वापरला आहे जो अनेक महिलांचे काम सोपे करत आहे.

हेही वाचा –समुद्रकिनारी योगा करणे बेतलं जीवावर! मोठी लाट आली अन् अभिनेत्री…., Viral Video पाहून काळजात धडकी भरेल

व्हायरल फोटो पाहून नेटकरी खळखळून हसले आणि मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एकाने उपाहासात्मक टिका केली की, “बायको समोर सगळे वाघ मांजर होतात”
दुसरा म्हणाला, “ही काकू लयच चंचल आणि चतुर असेल.”

Story img Loader