Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हारल होत असतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण डान्सचे व्हिडीओ शेअर करत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चेहऱ्यावर घुंघट ओढलेल्या काकू भन्नाट डान्स करताना दिसत आहे. काकूंचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
हा व्हायरल व्हिडीओ एका घरगुती कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये साडी नेसलेल्या एक काकू दिसत आहे. त्यांनी चेहऱ्यावर घुंघट ओढलेला आहे. चेहऱ्यावर घुंघट ओढलेला असताना सुद्धा त्या खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे. काकूंच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ‘पार्टी ओव्हर नाईट’ या गाण्यावर या काकू डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे काकूने घुंघट ओढल्यामुळे त्यांचा चेहरा शेवटपर्यंत दिसत नाही.
payalchavariya या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, “सिक्रेट सुपरस्टार” तर एका युजरने लिहिलेय,”घुंघट ओढणाऱ्या रॉकस्टार काकू” अनेक युजर्सनी काकूंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.”