आयुष्यात खूप सुंदर आहे पण आनंदाने जगता यायला पाहिजे असे म्हणतात पण याचा अर्थ कोणाला माहित आहे का? नसेल सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला काकूंचा हा व्हिडिओ बघा. व्हायरल व्हिडीओमध्ये काकूंनी दिलखुलास डान्स पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयुष्यात अडचणी येतच असतात पण जेव्हा आनंदी राहण्याची संधी मिळते तेव्हा त्या क्षणाचा पुरे पुर आनंद घेता यायला पाहिजे आणि हा आनंद कसा अनुभवायचा हे काकूंचा डान्स पाहू लक्षात येईल.

येथे पाहा Viral Video

काकूचां दिलखुलास डान्स

व्हायरल व्हिडीओमध्ये “हवा हवा ऐ हवा, खुशबू लुटा दे…” या गाण्यावर काकू बिनधास्तपणे डान्स करत आहे. काकूंच्या चेहऱ्यावरील हावभाव सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नाचताना काकुंच्या चेहऱ्यावर आनंदही दिसतो आहे. घरातील सर्व लोक कौतुकांने काकुंचा डान्स पाहत आहे. व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.

नेटकऱ्यांना प्रचंड आवडला काकूंचा डान्स

व्हिडिओ इंस्टाग्रामवर nita.patil123 नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “व्हायरल काकूंचा दिलखुलास डान्स” व्हिडिओवर कमेंट करत अनेकांनी काकुंचे कौतुक केले आहे. एकाने कमेंट केली की,” “दिलखुलास आनंदीत होऊन जगण्याची कला” दुसऱ्याने कमेंट केले की, “डान्स करणं ही एक कला आहे. ती सगळ्यांना जमत नाही. मस्त!” तिसऱ्याने कमेंट केली की,”छान डान्स केला तुम्ही मला पण आवडते डान्स करायला पण एवढा चांगला डान्स नाही जमते.”