केंद्रिय मंत्री स्मृती इराणी सोशल मीडियावर कायमच अपडेट असतात. नुकताच त्यांनी एक आगळावेगळा बुमरॅंग व्हिडियो शेअर केला आहे. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडियो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या बुमरॅंगला त्यांनी छानसे कॅप्शनही दिले आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या त्यांच्या या बुमरॅंग व्हिडियो अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत काढला आहे. या दोघींची अचानक विमानतळावर भेट झाली, त्यावेळी त्यांनी हा व्हिडियो शूट केला. यात स्मृती इराणी लिहीतात. जेव्हा जान्हवी कपूर तुम्हाला काकू म्हणत असल्याबद्दल अतिशय नम्रपणे तुमची माफी मागते. तेव्हा मी (स्मृती इराणी) म्हणतात कोई बात नही बेटा, ये आज कल के बच्चे…खरंतर हा अगदी सामान्य बुमरॅंग आहे पण इराणी यांनी त्याला दिलेल्या कॅप्शनमुळे त्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

धडक सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलेली जान्हवी सध्या तिच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा बायोपिक असून गुंजन सक्सेना या भारतीय महिला पायलटच्या जीवनावर तो आधारीत आहे. भारतीय सैन्यात महिला पायलट म्हणून अभिमानास्पद कार्य केलेल्या गुंजन यांच्यावरील हा बायोपिक पुढील वर्षात प्रदर्शित होईल अशी आशा आहे. स्मृती इराणी कायमच आपल्या इन्स्टाग्रामवर विनोदी पोस्ट आणि बॉलिवूडशी निगडित मिम्स पोस्ट करत असतात. त्याचप्रमाणे त्यांनी जान्हवी कपूरसोबतचा व्हिडियो शेअर करत त्याला आगळीवेगळी कॅप्शन दिली आहे. स्मृती इराणींचा हा व्हिडियो एका दिवसात ४ लाखांहून अधिक जणांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Story img Loader