भारुड हा पारंपरिक आणि लोकप्रिय असा कला प्रकार. भारुड्याची चाल लागली तर, तो म्हणणारा आणि ऐकणाराही त्यात दंग होऊन जातो. औरंगाबादचे महापौर भगवान घडामोडे यांचा भारुडावरील नृत्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महापौर घडामोडे यांच्या या ‘विंचू चावला’वरील नृत्याची औरंगाबादमध्ये जोरदार चर्चा आहे.
आगं…गग…गग… विंचू चावला. हे भारुड गात असताना भगवान घडामोडे त्याच्यावर ठेका धरताना या व्हिडिओत दिसतात. त्यांचा हा डान्स पाहणाऱ्यालाही हसू आवरणं अशक्य होतंय. त्यांच्या स्टेप्समुळं हा व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत आहे. घडामोडे यांच्यासोबत भाजपचे आमदार अतुल सावेदेखील आहेत. महापौरांचा नृत्याविष्कार पाहिल्यानंतर त्यांनादेखील हसू आवरणं अशक्य झालं. आषाढी-एकादशीला औरंगाबादजवळील पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी जमते. प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या छोट्या पंढरपुरात आषाढीला वारकऱ्यांचा मेळा भरतो. भगवान घडामोडे हे देखील वारकरी आहेत. तेही वारीदरम्यान टाळ-चिपळ्या आणि मृदुंगाच्या गजरात सुरु असलेल्या भारुडात तल्लीन झाले. औरंगाबादहून वाळूज-पंढरपूरकडे जात असताना वारीदरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे.
(ट्रेडिंग सेक्शनमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या या सोशल मीडियावर काय व्हायरल होतंय यावरून केलेल्या असतात. त्याची सत्यता पडताळून बघू शकत नाही.)