ऑस्ट्रेलियातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे येथील एका ६४ वर्षीय महिलेच्या मेंदूत जिवंत अळी आढळून आली आहे. शिवाय अशा प्रकारची जगातील ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, त्यांच्या कारकिर्दीतील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. या महिलेमध्ये न्यूमोनिया, पोटदुखी, जुलाब, कोरडा खोकला, ताप आणि रात्री घाम येणे अशा प्रकारची लक्षणे दिसत होती. २०२१ पासून डॉक्टर या महिलेवर स्टिरॉइड्स आणि इतर औषधांनी उपचार करत आहेत.

२०२२ मध्ये या महिलांमध्ये नैराश्य आणि विस्मरणाची लक्षणेही दिसू लागली. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्या मेंदूचे एमआरआय स्कॅन केले, ज्यामध्ये डॉक्टरांना काही गडबड आढळून आली. त्यानंतर त्यांनी महिलेला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.शस्त्रक्रिया केल्यानंतर महिलेत्या मेंदूत एक जिवंत अळी असल्याचं उघडकीस आलं. न्यूयॉर्क पोस्टने द गार्डियनच्या हवाल्याने लिहिलं, कैनबरा येथील संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ. संजय सेनानायके म्हणाले, “न्यूरोसर्जनने शस्त्रक्रिया केली नाही कारण त्यांना महिलेच्या मेंदूमध्ये एक फिरणारी जिवंत अळी आढळली.”

Diagnostic accuracy of capsule endoscopy
‘कॅप्सूल एंडोस्कोपी’द्वारे गंभीर आजाराचे अचूक निदान! ७३ वर्षीय वृद्धाचे वाचले प्राण;  जाणून घ्या अत्याधुनिक प्रक्रिया…
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Kajol reveals weirdest rumour about her
काजोल प्रवास करत असलेलं विमान क्रॅश झालंय; अभिनेत्रीच्या आईला कोणीतरी फोन करून सांगितलं अन्…; काय घडलेलं?
mother and son died drowning Nashik district,
नाशिक जिल्ह्यात बंधाऱ्यात बुडून मायलेकासह तिघांचा मृत्यू
A 15 year old girl was saved by advanced treatment in Pune print news
मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचूनही ‘ती’ बचावली! पंधरा वर्षीय मुलीची कहाणी
Rumours of bombs due to science experiments police got confuse
विज्ञानाचा प्रयोग, बॉम्बची अफवा अन् पोलिसांची तारांबळ, काय घडले नेमके?
doctor from Mumbai who was selling illegal drugs was arrested in Bhandara
पोतडीत औषध भरून उपचारासाठी लॉजवर यायचा मुंबईचा डॉक्टर; पोलिसांनी छापा टाकला अन् …
13 year old girl stands again despite being paralyzed from waist down due to rare disease
दुर्मीळ आजारामुळे कंबरेपासून खालचा भाग निकामी होऊनही १३ वर्षीय मुलगी पुन्हा उभी राहिली!

हेही पाहा- “पृथ्वी फिरत नाही आणि ती गोलही नाही…” पाकिस्तानी विद्यार्थ्याचा जगावेगळा दावा, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “यांना इंजिनिअर्सची…”

सापांमध्ये आढळते ही अळी –

सर्जिकल टीमला ३ इंच लांबीची, चमकदार लाल, परजीवी राउंडवर्म सापडली ज्याला शास्त्रज्ञ ओफिडास्कॅरिस रॉबर्टसी म्हणून ओळखतात. महिल्याच्या मेंदूतील ती रेंगाळत होती. शिवाय त्याचं माणसाच्या शरीरात सापडणं धक्कादायक होतं कारण ती सामान्यतः सापांमध्ये आढळते. राउंडवर्मचा हा विशिष्ट प्रकार कार्पेट पायथन्समध्ये आढळतात, जी कंस्ट्रक्टरची एक मोठी प्रजाती असून त्या ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि पापुआ न्यू गिनीमध्ये आढळतात.

सापांमध्ये आढळणारी अळी महिलेच्या शरीरात कशी गेली हे डॉक्टरांना समजत नाहीये. तसंच या महिलेचा सापांशी थेट संबंध नव्हता, माज्ञ, तिच्या घराजवळ असणाऱ्या तलावाशेजारी अनेक साप राहतात. त्यामुळे महिलेने खाल्लेल्या पालकासारख्या खाद्यपदार्थावर अळीने अंडी घातली असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ही महिला पालक अन्नासाठी पिकवत असे, त्यामुळे त्यावर अळीची अंडी आली असावी, असा अंदाज लावला जात आहे.