Shocking video: जगात असे अनेक लोक आहेत जी विचित्र प्रकार करीत असतात. अनेकदा लोक सर्व सीमा पार करतात. एका डिलिव्हरी बॉयनेही असचं काहीसं कृत्य केलं आहे. जे ऐकल्यानंतर तुमचं रागावर नियंत्रण राहणार नाही. कारण त्याने कोणतंही विनोदी कृत्य केलेलं नाही, तर अत्यंत लज्जास्पद घटना समोर आली आहे. नेमकं काय केलं या डिलिव्हरी बॉयने? जाणून घ्या. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
आजकाल कोण काय करेल याचा काही नेम नाही. सध्या डिलिव्हरी बॉयचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, जो पाहून तुमचाही राग अनावर होईल.
नेमकं काय घडलं?
डिलिव्हरी बॉय येथे कोणाच्या घरी सामान देण्यासाठी आला होता. तो लिफ्टने वर जात होता. त्यावेळी त्याच्याशिवाय लिफ्टमध्ये कोणी नव्हते. मात्र यामध्ये त्याने सर्व मर्यादा पार केल्या आणि लिफ्टमध्येच लघवी केली. इतकच नाही तर त्याने सर्वत्र घाण पसरवली. धक्कादायक म्हणजे जेव्हा त्याने हे कृत्य केलं तो वारंवार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहत होता. या घटनेबाबत कळताच सोसायटीत गोंधळ उडाला आहे. अद्याप या आरोपीची ओळख पटू शकलेली नाही. मात्र ही घटना चर्चेचा विषय बनली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ऑर्डर देणाऱ्या ग्राहकानेही डिलिव्हरी बॉयविरोधीत तक्रार केली असून त्याचा लिफ्टमधील सीसीटीव्हीत लघवी करतानाचे दृश्य कैद झाले आहे. लिप्टमध्ये प्रवेश केल्यानंततर डिलिव्हरी बॉय एका कोपऱ्यात उभा राहून लघवी करतो. तसेच लिफ्टथांबल्यानंतर तो डिलिव्हरीसाठी बाहेर पडतो. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संतापजनक अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पाहा व्हिडीओ
ही पहिली घटना नसून यापूर्वीही २०१८ मध्ये चीनमधून अशा प्रकारची घटना समोर आली होती. ज्यामध्ये एक व्यक्ती लिफ्टमध्ये लघवी करीत असल्याचे समोर आले होते. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ या @sheetrandum या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर लोक संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटंलय, या लोकांना सोसायटीत प्रवेशच द्यायचा नाही, तर आणखी एकानं, “अरे थोडी तरी लाज बाळगा” अशी प्रतिक्रिया दिली आहेय.