आजपर्यंत चोरीच्या आपण अनेक बातम्या ऐकत असतो, वाचत असतो. काही ठिकाणी पैश्यांची चोरी होते तर काही ठिकाणी दागिने, इतर मौल्यवान वस्तू चोरल्याचे आपल्या कानावर येत असते. परंतु, ऑस्ट्रेलियामधील कर्लिंगफोर्डमधील एका सर्व्हिस स्टेशनवर, क्रिस्पी क्रीम [Krispy Kreme] कंपनीचा डोनट्स [पाश्चात्य गोलाकार गोड पदार्थ] घेऊन जाणारी एक व्हॅन चक्क चोरीला गेली असल्याची नाईन न्यूजच्या [Nine news] माहितीवरून समजते. या ट्रकमध्ये विविध प्रकारचे क्लासिक आणि विशेषतः ख्रिसमससाठी नुकतेच तयार केलेले १० हजार डोनट्स होते, जे न्यू कॅसलपर्यंत पोहोचणे अपेक्षित होते. परंतु, आता या व्हॅनची चोरी झाली असल्याने या सर्व प्रकारची तक्रार पोलिसांकडे केली असून, तेथील पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे.

“पोलिसांनी या ‘गोड खाऊ चोराला’ शोधण्यासाठी आपले शोधकार्य सुरू केले असून, ते तिला लवकरच पकडतील अशी आमची आशा आहे. जेव्हा व्हॅनचा चालक सर्व्हिस स्टेशनमध्ये होता, तेव्हा ती महिला व्हॅन रिकामी असताना त्यामध्ये शिरली आणि चोरून घेऊन गेली”, असे क्रिस्पी क्रीमने केलेल्या विधानात म्हटले आहे.

Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
issue of ministery post between Devendra Fadnavis Eknath Shinde and Ajit Pawar is likely to be resolved in Delhi
खातेवाटपाचा पेच आता दिल्लीतच सुटण्याची शक्यता
fake Goods Market Pune, fake Goods, Market Pune,
शहरबात… बनावट मालाच्या बाजारपेठांना रोखणार कोण?
governor scam marathi news
नाशिकच्या ठकबाजाकडून नागपुरात गोशाळा उभारण्यासाठी तीन कोटी
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde ,
खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर

नाईन न्यूजच्या बातमीनुसार, क्रिस्पी क्रीमने दिलेल्या माहितीप्रमाणे व्हॅनचा चालक जेव्हा सर्व्हिस स्टेशनमध्ये होता, तेव्हा व्हॅनमध्ये घुसून चोरी करणाऱ्या त्या महिलेचा कुठेही नामोनिशाण नव्हता. मात्र, त्या सर्व्हिस स्टेशनमधील पेट्रोल पंपाजवळ एक महिला फिरत असल्याचे तेथील सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. ही महिला हळू हळू क्रिस्पी क्रीमच्या व्हॅनजवळ येऊन कुणालाही काही कळायच्या आत त्यामध्ये जाऊन बसली व व्हॅन घेऊन पळून गेली. या व्हॅनमध्ये १० हजार डोनट्स असून, एका डोनटची किंमत चार डॉलर्स असून सर्व डोनट्स तब्बल ४० हजार डॉलर्स, म्हणजेच जवळपास ३३ लाख इतक्या रुपयांचे होते.

हेही वाचा : ‘मोये मोये’ गाण्याचा ट्रेंड तर माहित आहे; पण त्याचा नेमका अर्थ काय ते पाहा…

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या क्रिस्पी क्रीम सप्लाय चेनच्या प्रमुख [पुरवठा साखळीच्या प्रमुख] लेनी रेड्डी [Lenny reddy] यांनी या चोरीची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये केली असल्याची माहिती दिली आहे. “आमचे क्रिस्पी क्रीमचे सर्व कर्मचारी मिळून चोरीला गेलेल्या डोनट्सची भरपाई करण्याचा प्रयत्न करत असून, झालेल्या सर्व प्रकाराबद्दल आणि गैरसोयीबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. मात्र, या सगळ्यात आम्ही, एनएसडब्ल्यू [NSW] पोलिसांचे आभार मानतो. त्यांनी आम्हाला या प्रकरणात प्रचंड मदत केली आहे”, असेदेखील लेनी रेड्डी म्हणत आहेत.

कायदेशीररित्या सुरू असणाऱ्या या प्रकरणाचा तपास चालू असून, या घटनेचे ज्यांच्याकडे सीसीटीव्ही फुटेज असेल त्यांनी पुढे येऊन सहकार्य करावे, अशी विनंतीदेखील त्यांंनी केली आहे.

Story img Loader