लॉटरी जिंकणे हा नशीबाचा भाग असतो असे म्हटले जाते. नियमितपणे लॉटरी लावणारेही जगभरात आज अनेक लोक आहेत. आपल्याला एकदा तरी लॉटरी लागावी या आशेवर हे लोक वाट पाहत असतात. मग ती लागली नाही उदास होतात आणि लागली की त्यांच्या आनंदाला पारावर राहत नाही. एका व्यक्तीची अशीच काहीशी अवस्था झाली आहे. याचे कारण म्हणजे त्याला एक दोन वेळा नाही तर १४ वेळा लॉटरी लागली आहे. हा व्यक्ती रोमानियातील असून गणितज्ज्ञ असलेल्या स्टीफन मंडेल या व्यक्तीने या लॉटरी जिंकल्या असून त्याने कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही.
ते मूळचे ऑस्ट्रेलियन नागरिक असून नोकरी करत असतानाच मंडेल यांनी जास्तीचे पैसे कमावण्यासाठी लॉटरीच्या क्षेत्रात प्रवेश केला. आपल्या गणिताच्या ज्ञानाचा उपयोग करुन त्यांनी एक सूत्र बनवले. त्याचा उपयोग करुन ते लॉटरी काढत असत आणि ती जिंकत पण असत. आता त्यांना इतक्यांदा लॉटरी लागत असल्याने काहीसे त्रस्त होऊन लॉटरी काढणाऱ्यांना चक्क लॉटरीचे नियमच बदलले आहेत. या लॉटरीतून मोठा लाभ झाल्यानंतर ते रोमानियातून आपल्या मूळ ठिकाणी ऑस्ट्रेलियामध्ये आले. याठिकाणीही त्यांनी लॉटरी घेणे सुरु ठेवले. अशाप्रकारे एकाच व्यक्तीला सातत्याने लॉटरी लागत असल्याने कंपनीने नियमच बदलले. एकाच व्यक्तीने लॉटरीची एकाहून जास्त तिकीटे खरेदी करणे चुकीचे असल्याचा नियम कंपनीने लागू केला.
ऑस्ट्रेलियामध्ये नियम बदलल्याने या व्यक्तीने अमेरिकेच्या लॉटरीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यातूनही त्याने ३ कोटी डॉलरहून जास्त रक्कम कमावली. या तऱ्हेने मंडेल यांनी एक लॉटरी रोमानिया, १२ ऑस्ट्रेलियामध्ये तर आणखी एक सर्वात मोठी लॉटरी व्हर्जिनियामध्ये जिंकली. यानंतर या व्यक्तीने ब्रिटन आणि इस्राईलमध्ये लॉटरी खरेदी केली. यामध्ये काहीतरी घोटाळा केल्यामुळे या व्यक्तीला २० महिने कारागृहात रहावे लागले.