कोणत्याही देशाचे पंतप्रधान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक वेगळं चित्र निर्माण होतं. सतत सुरक्षारक्षकांचा गराडा, बोलण्या-वागण्यातला एक रुबाब असे पंतप्रधान आपण सर्वांनी अनुभवले असतील. मात्र श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० सामन्यादरम्यान एक वेगळचं चित्र पहायला मिळालं. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन हे सामन्यादरम्यान चक्क आपल्या खेळाडूंसाठी पाणी घेऊन मैदानात उतरले. हे अनोखं चित्र पाहताच मैदानात उपस्थित लोकांनी आणि खेळाडूंनी मॉरीसन यांना दाद दिली.

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने ८ बाद १३१ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल पंतप्रधान एकादश संघाने आक्रमक सुरुवात केली. मात्र त्यांना विजयासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. अखेरीस १९.५ षटकात ९ गडी माघारी परतले असताना पंतप्रधान एकादश संघाने विजय मिळवला.