ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांच्यावर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यांनी ट्विटरवर आपल्या नातीसोबतचा फोटो शेअर केलाय ज्यामुळे त्यांच्यावर लोकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलीय. आपल्या कुशीत त्यांनी नातीला घेतले आहे आणि दुसऱ्या हातात बिअरचा ग्लासही दिसत आहे. हा फोटो टर्नबुल यांनी फेसबुकवर पोस्ट करत ‘मल्टीटास्किंग’ अशी कॅप्शनही लिहिली. पण लोकांनी मात्र त्यांना पूर्णपणे बेजबाबदार ठरवलं आहे.

वाचा : धावता-धावता ‘तो’ प्रेमात पडला!, कृष्णवर्णीय मैत्रिणीला घातली लग्नाची मागणी

‘लहान मुलांपासून दारू दूर ठेवावी. कोणताही सुज्ञ माणूस लहान मुलांसमोर मद्यप्राशन करणार नाही. पण तुम्ही तर देशाचे पंतप्रधान आहात, तेव्हा तुम्ही इतके बेजबाबदार कसे वागू शकता?’ अशा प्रकारच्या हजारो प्रतिक्रिया त्यांच्या या फोटोवर आल्यात. नातीसोबतच्या फोटोवर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर टर्नबुलयांनी आपलं मत मांडल. ‘याला वेडसरपणाच म्हणावा लागेल की तुम्ही एखाद्या गोष्टीकडे एका वेगळ्याच नजरेने बघता’ अशी प्रतिक्रिया त्यांनी मेलबर्न रेडिओ स्टेशनच्या प्रतिनिधींशी बोलताना दिलीय.  पण जसे आहोत तसंच राहिलं पाहिजे, उगाच दिखावा कशाला? असं सडेतोड उत्तर देत त्यांनी ट्विटरवर ट्रोल करणाऱ्या लोकांचं तोंड बंद केलंय.

Story img Loader