करोनाविरुद्धचा लढ्यात संघर्ष करताना, करोना संसर्गाला रोखण्यासाठीचे निर्बंध, आर्थिक संकटांना तोंड देताना अनेकांचे हाल होताना दिसत आहे. अनेक देशांमध्ये ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन आणि कठोर निर्बंध लागू करण्यात आलेत. हॉटेल, क्लब बंद ठेवण्यात आलीय. अनेक ठिकाणी पर्यटनावरही बंदी घालण्यात आलीय.
मात्र ऑस्ट्रेलियामधील एका तरुणीने स्वत:च्या लग्न सोहळ्याच्याआधीच करोनाविरुद्ध लढण्यासाठी अगदी वेगळच धोरण स्वीकारलंय. या तरुणीने करोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी स्वत:च करोनाबाधित होण्याचा प्रयत्न केलाय. ऑस्ट्रेलियामधील प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मॅडी स्मार्ट नावाच्या तरुणीने टिकटॉवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ती अनोळखी व्यक्तींना मिठ्या मारताना दिसतेय.
एका नाईट क्लबमध्ये ही तरुणी करोनाचा संसर्ग व्हावा या उद्देशाने अनोळखी लोकांना मिठ्या मारतेय. मेलबर्नमधील हा व्हिडीओ आहे. ऐन लग्नाच्या वेळी करोनाचा संसर्ग होऊन संपूर्ण कार्यक्रम रद्द करावा लागू नये म्हणून ही महिला आता स्वत:ला संसर्ग करुन घेण्याचा प्रयत्न करतेय.
नक्की पाहा हे फोटो >> Photos: ‘या’ देशांमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळला नाही; यादीतील शेवटचे दोन देश पाहून आश्चर्य वाटेल
१५ सेकंदांच्या व्हायरल व्हिडीओ “करोनाचा संसर्ग होऊ द्या भावनांचा नको,” या कॅफ्शनसहीत शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओत ही तरुणी आपले ड्रिंक्स इतरांसोबत शेअर करतानाही दिसतेय. “जेव्हा पुढील सहा आठवड्यांमध्ये तुमचं लग्न असतं आणि तुम्हाला करोनाचा संसर्ग झालेले नसतो,” असं तिने डिस्प्रीक्शनमध्ये लिहिल्याच न्यू यॉर्ट पोस्टने म्हटलंय.
भारतात टिकटॉक बॅन असल्याने हा व्हिडीओ पहता येत नसला तरी जगभरामध्ये या व्हिडीओची चर्चा आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ओमाक्रॉनच्या पार्श्वभूमीवर १२ तारखेपासून सर्व डान्स क्लब आणि पब बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्याधीच हा व्हिडीओ व्हायरल झालाय.
नक्की पाहा हे फोटो >> Photos: एवढ्या वेगाने Omicron का पसरतोय? लक्षणं किती दिवसांनी दिसतात? रुग्ण किती दिवसात बरा होतो?
या व्हिडीओवर दोन्ही बाजूकडून कमेंट येत असल्याचं पहायला मिळत आहे. काहींनी हा अगदीच स्मार्ट मार्ग असल्याचं म्हटलंय. तर काहींनी हा वेडेपणा असल्याचं मत व्यक्त केलंय.