जगातील सगळ्याच पर्यावरण प्रेमींना हादरवून टाकणारी गोष्ट म्हणजे जैवविविधतेने नटलेली आणि जागतिक वारसा असलेली ऑस्ट्रेलियातील ‘ग्रेट बॅरियर रीफ’ आता पूर्णपणे नष्ट झाली असल्याची बातमी. आठवड्याच्या शेवटी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी चर्चेत आली. जगातील सात आर्श्चयांपैकी एक असलेली ग्रेट बॅरिअर रीफला पूर्णपणे मृत घोषीत करण्यात आले असल्याचे ‘आऊटसाइड’ या मासिकाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून जाहिर केले. त्याचबरोबर याचा बातमीला दुजोरा देण्यासाठी ‘दिर्घ आजारामुळे २०१६ साली ग्रेट बॅरिअर रीफचे निधन झाले’ अशा शिर्षकाखाली आलेला एक लेखही प्रसिद्ध करण्यात आला. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक पर्यावरण प्रेमींनी हळहळ व्यक्ती केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

छायाचित्र सौजन्य : Wikimedia Commons

या लेखाने जगभरातील पर्यावरणप्रेमींबरोबरच अनेक पर्यटकांनाही या गोष्टींनी गंभीर दखल घ्यायला लावली. पण ग्रेट बॅरिअर रीफ ही पूर्णपणे मृत झाली नसून ती मरणाच्या मार्गावर आहे अशा आशयाचे लेख अनेक नामांकित वृत्तपत्ताने प्रसिद्ध केल्यानंतर पर्यावरण प्रेमींना थोडे हायसे वाटले. सुमारे २५ दशलक्षांहूनही अधिक काळापासून ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरिअर रीफ अस्तित्त्वात आहे. ३ हजार किलोमीटर लांब असलेली ही रीफ म्हणजे जगातील सगळ्यात मोठे प्रवाळ बेट आहे. जगातील सगळ्यात जास्त प्रवाळांच्या प्रजाती या येथे पाहायला मिळतात. त्याचबरोबर १५०० प्रकारच्या उष्णकटीबंधीय माशांच्या प्रजाती, २०० पक्ष्यांच्या प्रजाती आणि दुर्मिळ अशी कासवांचे ग्रेट बॅरिअर रीफ हे घर आहे.
समुद्रातील पाण्याचे वाढते तापमान आणि मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण हे रीफ नष्ट होण्याचे मोठे कारण आहे त्यामुळे या प्रावाळांचा मुळ रंग हा पूर्णपणे नाहिसा होऊन ती नष्ट होत चालली आहेत. यात फक्त ७ टक्के प्रवाळांचा रंग कायम राहिल्याचा संशोधकांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाची ओळख असलेली ही रीफ पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येथे येतात. त्यामुळे या एकाच पर्यटन स्थळापासून ३.९० अब्ज डॉलरची कमाई या देशाला होते. एप्रिल महिन्याच ही रीफ अर्ध्याधिक नष्ट झाली होती. पण आता या लेखाने सगळ्यांचेच डोळे उघडले असून जवळपास नष्ट होत चाललेली रीफ वाचवण्यासाठी सोशल मीडियावर मोहिम सुरू झाली आहे. अजूनही उशीर झाला नसून सगळ्यांनी लाखो वर्षांचा हा वासरा वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहान करण्यात येत आहे.