भारत असो की आणखी कुठला देश. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सगळीकडजे मोठा आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये महिला सुरक्षित असतात असा सर्वसाधारण समज आहे. तो बऱ्याच अंशी खराही आहे पण पूर्वेकडचे देश असोत की पाश्चात्त्य देश, सगळीकडची पुरूषी मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत काहीच बदलणार नाही.
गावांपेक्षा शहरं स्त्रियांसाठी तुलनेने सुरक्षित मानली जातात. पण हा पुढचा व्हिडिओ पाहा
सौैजन्य- यूट्यूब
सायकलवरून जाणाऱ्या या मुलीला या व्हॅनमधले पुरूष अत्यंत असभ्य भाषेत छेडताना दिसतात. तिला स्पर्श करण्याचा अतिशय हिणकसपणे प्रयत्न करतात.
सर्वसाधारणपणे असा प्रकार घडल्यावर त्या स्त्रीची प्रतिक्रिया दबून जाण्याची असते. पण या व्हिडिओमधली ही मुलगी या गाडीचा फार धाडसाने पाठलाग करते आणि आपली छेड काढणाऱ्या या पुरूषांविषयी ची आपल्या डोक्यातली तिडीक कायम ठेवत पुढच्या सिग्नलला ही गाडी थांबल्यावर या व्हॅनचा साईड मिरर तोडते. हा सगळा प्रकार या मुलीच्या मागे बाईकवर असलेल्या एका माणसाने शूट केलाय. या सगळ्या प्करा
पण आता हा व्हिडिओ खरा आहे की तो कलाकारांना घेऊन बनवण्यात आलाय असा प्रश्न विचारला जातोय.
पुन्हा एकदा पाहा हा व्हिडिओ
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा सगळा प्रकार रेकाॅर्ड करणाऱ्या माणसाच्या हेल्मेटवर हा कॅमेरा लावल्याचं स्पष्ट कळतंय कारण तो जसा मान हलवतो तसा हा कॅमेरा हलतो. पण परदेशांमध्ये सुरक्षिततेतच्या दृष्टीने हेल्मेटवर कॅमेरा बसवण्याची अनेक पाश्चात्त्य देशांमध्ये पध्दत आहे. चलो ठीक है
पण आणखी एक बाब. असा नाट्यमय प्रकार जेव्हा घडत असतो त्यावेळेला ती रेकाॅर्ड करणारा एखादा सामान्य माणूस शक्यतो या घटनेतल्या मुख्य व्यक्तीच्या पाठोपाठ जातो. त्या व्यक्तीविषयी त्याला उत्सुकता असते. या व्हिडिओमधली मुख्य व्यक्ती आहे ती म्हणजे ही मुलगी. ती जेव्हा या गाडीचा आरसा तोडून पुढे जाते तेव्हा सामान्य माणूस तिच्या मागे ,ती पुढे काय करणार आहे या उत्सुकतेने गेला असता. पण या माणसाने ही बाई पुढे गेल्यावर अगदी सिनेमात वाटावं अशा पध्दतीने ‘असंच पाहिजे असंच पाहिजे’ सारखा एक टोमणा मारला आणि व्हिडिओ कट
पण चला याही बाबतीत या सगळ्यांना ‘बेनिफिट आॅफ डाऊट’ देऊयात आणि ही घटना खरंच घडली असं समजूया.
पण आता याहीपुढे जात हा प्रसंग ठरवून शूट केला आहे असं सांगणारे प्रत्यक्षदर्शी पुढे आले आहेत लंडनमधल्या ज्या रस्त्यावर हा प्रकार ‘घडला’ तिथे त्यावेळी असणाऱ्या काही लोकांनी हेल्मेटवर कॅमेरा असणारा माणूस या सायकलवाल्या मुलीला आणि या ‘व्हॅनपुरूषांना’ या शूटविषयी समजावून सांगताना पाहिल्याचा दावा केला होता. आता बोला!
हा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा तो कौतुकाने शेअर करणारे सगळेजण आता जाम वैतागलेत. पण विचार न करता आपल्याकडे जे आलंय ते शेअर करणाऱ्या आपल्या सगळ्यांचं काय आता हेच होणार.
[jwplayer caMgPBmA]