देशात मागील काही आठवड्यांपासून करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार उडाला आहे. करोना रुग्णांची दैनंदिन संख्या कमी झाली असली तरी मृतांची आकडेवारी वाढताना दिसत आहे. देशातील करोना परिस्थितीसाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. अशाच लसींचा तुटवडा, आरोग्य व्यवस्थांची कमतरता यासारख्या प्रश्नांवरुनही केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका होताना दिसत आहे. सोशल नेटवर्किंगवरही केंद्र सरकारच्या कामावरुन दोन गट पडल्याचं चित्र दिसत आहे. भाजपा समर्थकांनी केंद्र उत्तम काम करत असल्याचं म्हटलं आहे तर विरोधक मात्र येथेही केंद्र सरकारच यासाठी कसं दोषी आहे याबद्दल भाष्य करताना दिसतायत. यापूर्वी स्थलांतरित मजूर, बेरोजगारी, अर्थव्यवस्था यासारख्या मुद्द्यांवरुनही सरकार विरुद्ध विरोधक असं चित्र दिसून आलं आहे. वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येकजण आपलं म्हणणं मांडत असतानाच सध्या अॅमेझॉनवरील एका पुस्तकाची सोशल नेटवर्किंगवर जोरदार चर्चा सुरुय. या पुस्तकाच्या माध्यमातून विरोधकांनी उपहासात्मक पद्धतीने मोदींवर टीका केलीय.
या पुस्तकाचं नाव “मास्टरस्ट्रोक : ४२० सिक्रेट्स दॅट हेल्पड पीएम इन इंडियाज इम्पॉयमेंट ग्रोथ” असं असून हे पुस्तक अॅमेझॉनच्या साईटवर अपलोड करणाऱ्याने आपलं स्वत:चं नाव बेरोजगार भक्त असल्याचं म्हटलं आहे.
रेडइटवरील एका युझरने हे पुस्तक अॅमेझॉनच्या किंडल प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्याचा दावा केलाय.
(फोटो सौजन्य: रेडइट)
या पुस्तकाबद्दलची माहिती देताना, “एका महान नेत्याने अडथळत वाटचाल कऱणाऱ्या देशाला करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये कसा विजय मिळवून दिला आणि देशाला भरभराटीच्या मार्गावर कसं आणलं याची ही कथा आहे,” असं म्हटलं आहे. या पुस्तकावर ट्विटरवरुनही अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्यात.
१)
Someone has published a book on Amazon titled Masterstroke with 56 empty pages. Amazon has approved it. pic.twitter.com/UkJPLJX4mF
— PS (@D10SPS) May 25, 2021
२)
WHAT A “MASTERSTROKE ” !!
Amazon published a book “Masterstroke” which has 56 empty pages!
MASTERSTROKE: 420 secrets that helped PM in India’s employment growth!
AUTHOR-
Berozgar Bhakt#मोदी_पनौती_है https://t.co/rkkZHutkjB pic.twitter.com/xjAnvi7AQ2
— AVIR (@AvirWithINC) May 25, 2021
३)
Looks like Amazon is going to shut soon in India.
Someone has published a book on Amazon titled Masterstroke. It has all blank pages pic.twitter.com/Y5vybkBFik— भयंकर लोग (@BhayankarLog) May 25, 2021
४)
MASTERSTROKE: 420 Secrets That Helped PM In India’s Employment Growth — is now available on Amazon for ₹56. The Book is written by ‘Berozgar Bhakt’ and all the pages of the book are empty. Genius!https://t.co/EiJgb5PZTX
Pls don’t forget to read the reviews! pic.twitter.com/hEfqmHcBjY
— Gaurav Pandhi (@GauravPandhi) May 25, 2021
५)
Have you heard of a stunning book called Masterstroke: 420 secrets that helped PM in India’s employment growth? Read the reviews attached here… It was also available on Amazon.
Seeking comments of @srinivasiyc, @puru_ag @ziyaussalam, @sachin_inc#BJP_Fears_SocialMedia pic.twitter.com/ID5S4Dr9RP— Satish Gore (@Satish_B_Gore) May 26, 2021
विशेष म्हणजे अनेकांनी या पुस्तकाचे रिव्ह्यूही लिहिले आहेत. एकदम पटकन वाचून झालं हे पुस्तक, नावात वापरलेला ४२० क्रमांक अगदी योग्य आहे या आणि अशाप्रकारच्या अनेक कमेंट या पुस्तकाच्या रिव्ह्यूमध्ये करण्यात आल्यात. पाहुयात असेच काही रिव्ह्यू…
हे पुस्तक प्रकाशित करणारा नक्की कोण आहे याची माहिती आणि खरं नाव समोर आलं नसलं तरी नेटकऱ्यांना या निमित्ताने चर्चेसाठी एक विषय मिळालाय हे मात्र नक्की.