Viral Video: स्वतःचा आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून अनेक रिक्षा चालक त्यांच्या रिक्षा विविध वस्तुंनी सजवतात. उन्हाळ्यात रिक्षात छोटा पंखा, गारेगार वाटावे म्हणून लहान झाडे, तर पाणी किंवा खाण्यापिण्याचा गोष्टी सुद्धा रिक्षात ठेवतात. तर काही जण विविध लाइटिंग, छोटा स्पीकर लावून रिक्षात गाणी सुद्धा लावतात जेणेकरून प्रवाशांचा प्रवास मनोरंजक होईल. आतापर्यंत तुम्ही अनेक रिक्षा चालकांना प्रवाशांसाठी वा स्वतःसाठी रिक्षा सजवलेली पाहिलं असेल. पण, आज एका रिक्षा चालकाने चक्क त्यांच्या सोडून गेलेल्या प्रेयसीसाठी रिक्षा सजवली आहे.

एक तरुणी तिच्या घरी जाण्यासाठी रिक्षा शोधत असते. तेव्हा तिला एक रिक्षा भेटते व ती त्यात बसून तिच्या घराकडे जाण्यास निघते. पण, तरुणी जेव्हा रिक्षात बसते. तेव्हा तिला दिसते की, रिक्षा लाल आणि पांढऱ्या रंगाच्या लाइटिंगने सजवलेली असते. तसेच रिक्षाच्या मागे ए आणि एस ( A & S) असे इंग्रजी अक्षरात लिहिलेले असते. रिक्षात केलेली सुंदर सजावट पाहून तरुणी रिक्षाचकाची प्रशंसा केली. पण, रिक्षा चालकाने सजावटीमागील खरं कारण सांगितले तेव्हा तरुणीला आश्रू अनावर झाले नाही. ऑटोरिक्षा चालकाची ही हृदयस्पर्शी गोष्ट तुम्हीसुद्धा व्हिडीओतून पाहा…

हेही वाचा…एसीतून येणाऱ्या पाण्याचा केला ‘असा’ पुनर्वापर; पट्ठ्याचा जुगाड पाहून नेटकरी म्हणाले, ‘हा तर एलॉन मस्क…’

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रिक्षातून प्रवास करताना तरुणीला अगदी शांत वाटत असते. कारण रिक्षाचालकाने लाल आणि पांढऱ्या रंगाची लाइटिंग करून रिक्षाची सजावट केलेली असते. तसेच प्रवासी बसणाऱ्या सीटच्यावर (रिक्षाच्या छतावर) एक आरसा सुद्धा लावलेला असतो. जेव्हा तरुणी ही सजावट बघते तेव्हा प्रभावित होते आणि रिक्षा चालकाचे कौतुक करते. तेव्हा रिक्षा चालक यामागची गोष्ट सांगतो. रिक्षा चालकाने ही सजावट त्याच्या प्रेयसीच्या आठवणीत केलेली असते. ऑटो रिक्षा चालक कामानिमित्त दिल्लीला येतो. त्या दोन दिवसात त्याच्या प्रेयसी दुसऱ्या बरोबर लग्न करते.

ऑटोच्या मागच्या बाजूला असलेल्या अक्षरांकडे बोट दाखवत ऑटो रिक्षा चालक म्हणतो की, ” ए एस ( A S) लिखवाके ना मेरे दिल को खुशी मिलती है’ (ही अक्षरं लिहून घेतल्याचा मला आनंद आहे)”. बहुधा ही अक्षरे रिक्षा चालक आणि प्रेयसीच्या नावांची पहिली अक्षरे असावीत. म्हणून तिच्या आठवणीत त्याने रिक्षाच्या मागे ही अक्षरे लिहून ठेवली आहेत. या सगळ्या गोष्टी पाहून आणि रिक्षा चालकाची हृदयस्पर्शी गोष्ट ऐकून तरुणीच्या डोळ्यात नकळत पाणी येते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तरुणीच्या @onupomo या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे ; जो सध्या अनेकांना भावुक करतो आहे.