Bengaluru Auto driver viral post: सोशल मीडियावर अनेकदा रिक्षाचालकांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये इंग्रजी बोलणारे रिक्षाचालक अथवा रिक्षामध्ये पॅसेंजरबरोबर वाद घालणारे रिक्षाचालक, असे अनेक व्हिडीओ याआधी आपण पाहिलेच असतील. पण, सध्या एक वेगळाच व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आलाय; ज्यात बेंगळुरूमधील एका रिक्षाचालकाने डिजिटल पेमेंटसाठी चक्क स्मार्ट वॉच बाहेर काढले.

व्हायरल पोस्ट

विश्वजित नावाच्या एक्स युजरने त्याचा अनुभव शेअर करत एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये रिक्षाचालकाबरोबर घडलेला एक प्रसंग त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला. त्यामध्ये पॅसेंजर असलेल्या विश्वजितने रिक्षाच्या भाड्यासाठी रिक्षाचालकाकडे ऑनलाइन पेमेंटची विनंती केली. तेव्हा रिक्षाचालकाने पेपरवर असलेला क्यू-आर कोड किंवा मोबाईलमधला क्यू-आर कोड न दाखवता, चक्क स्मार्ट वॉच बाहेर काढले आणि त्यात क्यू-आर कोड ओपन केला.

ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
india railway viral news Husband-Wife Fight
नवरा-बायकोतील भांडण अन् रेल्वेचे तीन कोटींचे नुकसान! OK मुळे चुकीच्या स्थानकावर पोहोचली ट्रेन; नेमकं घडलं काय? वाचा…
Terrifying Railway accident of railway employee due to train driver at barauni junction in bihar video viral
बापरे! चालकाच्या चुकीमुळे घडला मोठा अनर्थ, ट्रेन सुरू करताच झाला रेल्वे कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडल? पाहा VIDEO
leopard and deer Viral Video
‘नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही…’ हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावला; पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
Dog Viral Video
श्वानाला झोप अनावर झाल्यानं बसल्या जागी केलं असं काही… VIDEO पाहून पोट धरून हसाल

हेही वाचा… “Coldplay तर सोडाच पण…”, Book My Show क्रॅश होताच नेटकऱ्यांनी शेअर केले मीम्स, म्हणाले…

हा फोटो @Vishvajeet590 या x अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या फोटोला “Auto anna pulled out the #peakBengaluru move” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तसेच या पोस्टला सहा लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर ही पोस्ट तुफान व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिले, “आता हे क्यू-आर कोड पाहून आपणपण त्याला पैसे देऊ शकतो.” तर दुसऱ्याने “मॉडर्न प्रोब्ल्सना मॉडर्न सॉल्युशनची गरज आहे”, अशी कमेंट केली. तर एक जण म्हणाला, “वाह आता मी मान्य करतो की, भारत आता आधुनिक होत चालला आहे.”

हेही वाचा… पठ्ठ्याची हिंमत तर बघा! मिरवणूकीत चक्क पोलिसांसमोर केला डान्स अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “एक तरी नमुना…”

तर अनेकांनी क्यू-आर कोडचे पेपर कटआउट रिक्षामध्ये लावण्याचा सल्ला दिला. “मला ही कल्पना आवडली; पण रिक्षाचालकाने त्याच्या सीटच्या मागे पेपर कटआउट लावला, तर बरं होईल”, अशी कमेंट एकाने केली.

हेही वाचा… अम्मी घर में साप…! चिमुकलीच्या हाकेवर आई निशब्द, शेवटी मुलीनेचं दाखवलं धाडस; Videoमध्ये पाहा पुढे काय घडलं?

दरम्यान, रिक्षाचालकांचे असे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. याआधी बेंगळुरूमधील रिक्षाचालकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता; ज्यात एका महिलेने ओला ऑटो रद्द केली म्हणून रिक्षाचालकाने त्या महिलेला कानाखाली मारले होते.