मोबाईल, हेडफोन्स, पर्स यासारख्या छोट्या वस्तू हरवल्या तर त्या सहजासहजी मिळत नाही. या वस्तू परत मिळतील याची शक्यताही कमीच असते. मात्र, याबातीत बंगळुरू येथील महिलेचे नशीब बलवत्तर म्हणावे लागेल, कारण तिचे हरवलेले एअरपॉड्स तिला एका ऑटो चालकाने परत केले आहेत.

ऑटो चालकाने अ‍ॅपल एअरपॉडच्या सहायाने महिलेला शोधून तिचे एअरपॉड परत केले. या घटनेला तिने ‘पीक बंगलुरू मोमेंट’ म्हणून ट्विटरवर शेअर केले आहे. शिदिका असे या महिलेचे नाव आहे. शिदिकाने ट्विटरवर सांगितले की, ऑटोमध्ये प्रवास कराताना तिचे एरपॉड्स हरवलेत. मात्र, अर्ध्या तासानंतर तिला वीवर्क येथे सोडणाऱ्या ऑटो ड्रायव्हरने सुरक्षारक्षकाला तिचे एअरपॉड परत केले.

Increase in the number of people obtaining international driving licenses pune news
पुणे: आंतरराष्ट्रीय वाहनचालक परवाने काढणाऱ्यांमध्ये वाढ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mother Always Protect Her Child
आई आहे ना…! वेगात येणारी राईड पाहून चिमुकलीने काढला पळ अन् पाहा VIDEO चा जबरदस्त शेवट
cab driver viral video
VIDEO : टॅक्सी चालकाला पोहोचायला ७ मिनिटांचा उशीर, महिलेने घातला राडा; चालकाच्या अंगावर थुंकत म्हणाली…
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
mini buses with best logo running on the Nashik Kasara route
मुंबईच्या रस्त्यांवर बेस्टच्या अनधिकृत गाड्या, नाशिक मार्गावरही बेस्टच्या गाड्यांचा वापर; कंत्राट रद्द झालेल्या गाड्यांचा गैरवापर
Success story of kalpana saroj who got married at 12 now owning crores business
बाराव्या वर्षात लग्न अन् सासरच्यांचा छळ! पण हार न मानता २ रुपयांची कमाई करणाऱ्या ‘या’ महिलेने उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य
Navi Mumbai Accident
VIDEO : विरुद्ध दिशेने वाहन चालवणं नवी मुंबईतील दोन तरुणींच्या जीवावर बेतलं; कारच्या धडकेत मृत्यू

(Sunday Mood दाखवणाऱ्या या मांजरीने जिंकली नेटकऱ्यांची मनं; पाहा Viral Video)

ऑटो चालकाने तिला कसे शोधले याबाबतही तिने खुलासा केला. चालकाने एअरपॉड मालकाचे नाव माहिती करण्यासाठी ते कनेक्ट केले आणि नंतर माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी फोन पे ट्रान्झॅक्शनचा वापर केला, असे तिने ट्विटमध्ये सांगितले. तिचे हे ट्विट अनेक युजर्सना आवडले आहे. ट्विटला ९ हजार ९८८ लाईक्स मिळाले असून त्यावर युजर्सनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

युजर्सनी ऑटो चालकाचे कौतुक केले असून त्यास टेक सॅव्ही असे संबोधले आहे. ऑटो चालकांना इंजिनिअर्सपेक्षा अधिक तंत्रज्ञान आवडते का? तेही विशेषकरून बंगळुरूमध्ये, असा सावाल चकित झालेल्या एका युजरने उपस्थित केला, तर एकाने बंगळुरूचे ऑटो चालक हे आपल्यापेक्षाही अधिक टेक सॅव्ही असल्याचे कधीकधी वाटत असल्याचे म्हटले. तर एका युजरने ऑटो चालकाला बक्षीस देण्याचा सल्ला दिला आहे.

Story img Loader