Viral video: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असून त्यातून टॅलेंट समोर येताना दिसत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य घरातील व्यक्ती देखील त्यांच्या कलेचं प्रदर्शन करताना दिसत आहे. अशाच एका मुंबईच्या सर्वसामान्य रिक्षाचालकाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. मुंबईच्या रस्त्यावर अचानक मोहम्मद रफी यांची गाणी एकू येतात आणि सर्वांचं लक्ष रस्त्यावरुन धावणाऱ्या त्या रिक्षाकडे जातं. व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल रिक्षामध्ये स्पिकर लावले आहेत. मात्र कोणतेही स्पिकर लावलेले नसून मोहम्मद रफी यांचं गाणं एक रिक्षाचालक स्वत: गात आहे. हे पाहून सर्वच अवाक् झाले आहेत. विशेष म्हणजे व्हिडीओ पाहून सुप्रसिद्ध संगीतकारानेही रिक्षाचालकाची दखल घेतली. तुम्हीही पाहा या टॅलेटेंड रिक्षा चालकाचा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक रिक्षा मुंबईच्या रस्त्यावरुन भरधाव वेगात पळत आहे. आणि त्यातून वेगवेगळ्या गाण्यांचा आवज येत आहे. यावेळी तिथूनच जाणाऱ्या एका तरुणानं या रिक्षाचा पाठलाग केला असता लक्षात आलं ही गाणी रिक्षाचालक स्वत:च बोलत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या रिक्षाचालकाने रिक्षामध्ये माईक आणि स्पिकरची व्यवस्था केली आहे. मोहम्मद रफी यांचं “खोया खोया चांद खुला आसमान” हे गाताना रिक्षाचालक दिसत आहे. यावेळी तुम्ही पाहू शकता, रिक्षाला वेगवेगळ्या लाइट्सही लावल्या आहेत.

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध संगीतकार अमित त्रिवेदीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याचे कौतुक सुद्धा त्याने केले आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Viral Video: मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा! दोस्ताला मृत्यूच्या दारातून खेचलं, काळजाचा ठोका चुकवणारा अपघात

अनेक लोक आपल्या परिस्थितीवर नाराज असतात. त्यांना सतत दुसऱ्यांच्या राहणीमानाचं आणि त्यांच्या आरामदायी जीवनाचं कौतुक वाटतं. शिवाय श्रीमंत मित्रांच्या तुलनेत आपण खूपच कमी असल्याची तक्रार ते खासगीत करत असतात. मात्र, आपल्या आजुबाजूला काही लोक असेही असतात जे कोणत्याही तक्रारी न करता आयुष्याचा पुरेपूर आनंद घेतात.

Story img Loader